
[td_block_big_grid_7 td_grid_style=”td-grid-style-5″ sort=”featured”]
[td_block_20 limit=”3″ td_filter_default_txt=”All” custom_title=”This Week Trends” header_color=”#dd6b1f” ajax_pagination=”load_more” sort=”random_posts”]
[td_block_big_grid_4 td_grid_style=”td-grid-style-5″ sort=”featured”][td_block_14 limit=”3″ custom_title=”Month In Review” td_filter_default_txt=”All” td_ajax_filter_type=”td_category_ids_filter” header_color=”#c44c4c” td_ajax_filter_ids=”” sort=”random_posts” ajax_pagination=”next_prev”]
[td_block_18 limit=”5″ custom_title=”Hot Stuff Coming” td_filter_default_txt=”All” header_color=”#b953ed” sort=”random_posts”]
LATEST ARTICLES
नगर शहरासह तालुक्यात बिंगो जुगार जोरात; कारवाई करा अन्यथा ६ डिसेंबरपासून उपोषण

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसका मारून पळविले
बालिकाश्रम रस्त्यावरील घटना; २ अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
नगर – विडी कामगार महिलेच्या गळ्यातील साडे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने दुचाकीवरील दोघांनी ओरबाडले. शुक्रवारी (दि. १) सकाळी साडे दहाच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावरील जय शंकर मेन्स वेअरच्या समोर ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. शारदा रघुनाथ गाजुल (वय ६७ रा. जाधव मळा, बालिकाश्रम रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांच्या घरीच बिड्या बनविण्याचे काम करतात. त्यांनी बनविलेल्या बिड्या नवरंग व्यायामशाळा, तोफखाना येथे असलेल्या कंपनीमध्ये पोहच करण्यासाठी त्या शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडल्या होत्या.
बिड्या कंपनीत पोहच केल्यानंतर त्या बालिकाश्रम रस्त्यावरून घरी जात असताना जय शंकर मेन्स वेअरच्या समोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडले. यामध्ये अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याची सोन्याची चेन असा एक लाख पाच हजार रुपये किमतीचे साडे तीन तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. दागिने चोरणार्या चोरट्यांनी फिर्यादीला जोराचा ध क्का दिल्याने त्या खाली कोसळल्या. त्यानंतर चोरटे साताळकर हॉस्पिटलच्या दिशेने पसार झाले.
फिर्यादीने आरडाओरडा केल्याने घटनास्थळी गर्दी जमा झाली. त्यातील एका तरुणाने चोरट्यांचा दुचाकीवरून पाठलाग केला असता ते तोपयरत पसार झाले घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून बालिकाश्रम रस्त्यावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी

दादरचे नामांतर चैत्यभूमी करा अन्यथा ५ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करणार

निविदा मंजूर, निधीही उपलब्ध तरीही रस्त्याचे काम रखडले; काम सुरू करा अन्यथा बांधकाम विभागासमोर ‘आंदोलन’

व्यावसायिकाला रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने मारहाण

मुदत संपूनही केडगावमधील विकासकामे अपूर्णच राहिल्याने अखेर वकिलानेच बजावली प्रशासकिय यंत्रणेला ‘नोटिस’

अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील ७७६ रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचाराचे पुरावे विश्वास नांगरे यांच्याकडे सादर

गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपीवर ‘प्राणघातक हल्ला’

पाककला
रताळ्याचा राजस पाक
साहित्य : दीड किलो रताळी, दोन
नारळांचा चव, सहा-सात वाट्या साखर,
पाव किलो खवा, ट्रुटी-फ्रुटी, आवडीनुसार
सुकामेवा, रताळी परतण्याइतपत साजूक तूप,
दोन वाट्या दूध.
कृती : रताळी स्वच्छ धुऊन, सालं
काढून टाकावीत, किसणीवर किसून घ्यावीत.
साजूक तुपावर कीस चांगला परतावा. नंतर
नारळाचा चव घालून परतावा. नंतर खवा
घालून परतावा.
साखर+दूध घालून पुन्हा परतावा
आणि हलव्याइतपत घट्ट झाल्यावर खाली
उतरवावा.
खाली उतरवून त्यात आवडीनुसार
काजू, बदाम, टुटीफ्रुटी घालून सजवा. जास्त
गोड हवं असल्यास साखर जास्त घालावी.
मात्र रताळ्यालाही अंगची गोडी असते हे
लक्षात घेऊन साखरेचं प्रमाण ठरवावं.
