नगर – दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरुपी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही ही योजना राबविण्यात येत असून योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी
भारतीय जैन संघटनेने जबाबदारी स्विकारली आहे. मृदा व जलसंधारण विभाग व बीजेएसच्या संयुक्त विद्यमाने
या योजनेच्या प्रसारासाठी जलरथ तयार करण्यात आला असून याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते झाला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी आकाश परदेशी, बीजेएसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया, जिल्हाध्यक्ष प्रशांत गांधी, राज्य कार्यकारिणी सदस्य मनसुखलाल चोरडिया, विश्वजीत गुगळे, संजय शिंगवी, अमोल पटवा, दर्शन गांधी, नरेश सुराणा, नयन पोखर्णा, प्रसाद शहा, संतोष लोढा, आशिष राका, इपिटोम कंपनीचे अनुराग धूत, उपविभागीय अभियंता शिंदे, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, करण भळगट, आदिनाथ पवार, प्रतिक जगदाळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया म्हणाले, जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. तलावातून गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्यास मदत होईल. तसेच काढलेला गाळ शेतकर्यांच्या शिवारापर्यंत पोहचविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीलाही याचा उपयोग होणार आहे. बीजेएसच्या हकार्यातून ही योजना जिल्ह्यातील गावांमध्ये राबविण्यात येणार असून जलरथाव्दारे याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे.
आदेश चंगेडिया यांनी सांगितले की, दुष्काळमुक्तीसाठी भारतीय जैन संघटना मागील अनेक वर्षांपासून राज्यातील ग्रामीण भागात काम करीत आहे. याही वर्षी शासनाच्या सहकार्याने या योजनेच्या अंमलबजावणासाठी बीजेएसची टिम सज्ज झाली
आहे. जलरथ गावोगावी जावून जनजागृती करणार असून आवश्यक अर्ज भरून घेत प्रशासनामार्फत मंजुरी मिळाल्यावर संबंधित गावांत गाळ काढण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त गावे सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.