नगर – श्रीरामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडीट सोसायटी लि., च्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक रिंगणातील सद्भावना
पॅनलचा स्नेहमेळावा राजेंद्र बोथरा व मित्र परिवाराने सिताबन लॉनमध्ये आयोजित केला होता. पतसंस्थेचे संस्थापक
अध्यक्ष श्रीगोपाल धूत यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीस सामोरे जात आहे. यामधील राजकमल मणियार व शोभा राठी या
महिला राखीव मतदारसंघामधून साईनाथ कावट हे विमुक्त जाती व भटया जमाती मतदार संघामधून अनुरिता झगडे या इतर मागासवर्गीय विभागामधून तर देवराव साठे हे अनुसूचित जाती/जमाती विभागामधून बिनविरोध निवडून आले आहेत.
सर्वसाधारण मतदार संघातील सद्भावना पॅनलचे उमेदवार असे – राजेंद्रकुमार कंत्रोड, विश्वनाथ कासट, राजेंद्र गुजराथी, प्रकाश गांधी, ओमप्रकाश चांडक, लक्ष्मीकांत झंवर, सुधीर झालानी, अनुराग धूत, श्रीगोपाल धूत, प्रदिप पंजाबी, अॅड.अशोक बंग, किसनलाल बंग, गोपाल मणियार, राजेंद्र मालू आणि मधुसुदन सारडा. श्रीगोपाल धूत म्हणाले, वै.डोंगरे महाराज यांच्या आशीर्वादाने आणि स्व.काकासाहेब धूत यांच्या प्रेरणेने ४० वर्षांपासून या सोसायटीची वाटचाल प्रगतीपथावर
सुरू आहे. ध्येय कितीही उच्च असले तरी साधन शुध्द असले पाहिजे. माझी ही शेवटची निवडणूक आहे. सद्भावना पॅनलला
एकमुखी मतदान करा. आजच्या मेळाव्यात सभासदांनी व्यक्त केलेल्या मनोगतांनी आम्ही सर्वच भारावून गेलो आहोत. मतदान करून हा आपलेपणा वृद्धींगत करा, असे आवाहन करतो. मेळाव्यात कु.हर्षा गुजराथी, ब्रिजलाल सारडा, अनिल पोखरणा, प्रा.डॉ. शरद कोलते, मोहनलाल मानधना, नंदलाल मणियार, सीए अजय मुथा, अॅड.शरद पलोड, डॉ.
श्यामा मंत्री, प्रा.मधुसूदन मुळे, राजेंद्र चोपडा, राजेंद्र बोथरा, डॉ.कैलास झालानी, डॉ.विजय भंडारी, श्यामसुंदर सारडा, डॉ.श्रीकांत गांधी, जितेंद्र बिहाणी, आदेश चंगेडिया, नंदकुमार झंवर, प्रविण बजाज, राजेश झंवर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन लक्ष्मीकांत झंवर यांनी केले. ओमप्रकाश चांडक यांनी आभार मानले. मेळाव्यात सीए
रमेश फिरोदिया, आर.डी.मंत्री आदी उपस्थित होते.





