नगर – माजी आमदार अरुण जगताप यांची प्रकृती अचानकपणे बिघडली असून तातडीने सुधारणा व्हावी यासाठी अहिल्यानगर हिंदू मोची समाज सेवा संघ आणि जिनगर महिला मंडळाच्या वतीने श्री रामदेव बाबा मंदिरात महाआरती करत साकडे घातले.
लाडके अरुणकाका यांच्या प्रकृतीत तातडीने सुधारणा होऊन, नगरकरांच्या सेवेसाठी लवकर बरे व्हावे, अशी मनोभावना प्रार्थना करण्यात आली. यावेळी सौ. अरुणाताई गोयल, सौ. प्रमिला गोयल, सौ. ज्योति गोयल, ओमप्रकाश बायड, देवीचंद बायड, मनोहर चव्हाण, चंदन पवार, श्याम गोयल, अमित सोनग्रा, रामेश्वर चव्हाण आदीसह समाजातील नागरिक उपस्थित होते.
अरुण जगताप हे आपल्या कुटुंबातील व्यक्ति असल्यासारखे वाटतात. ते नेहमीच आपल्याशी चर्चा करीत असताना आदराने विचारपूस करत असतात. तसेच नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याचे काम करत आहे. काका आणि आमचा गेल्या अनेक वर्षांपासून जुना परिचय आहे, त्यांच्याबाबत आपलेपणाची भावना आहे. त्यांच्या प्रकृतीत तातडीने सुधारणा व्हावी यासाठी श्री रामदेव बाबा मंदिरात महारती करण्यात आली अशी माहिती अरुणा गोयल यांनी दिली