नगर – मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या व सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी जनतेने दबाव निर्माण करावा
तरच या प्रकरणी या कुटुंबियांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांनी केले. शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित मराठा समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी अहिल्यानगर येथे लवकरच सर्व जातीधर्मिय, सर्वपक्षीय महा जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. त्याच्या नियोजनासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्याच्या विविध भागातून मराठा समाजासह विविध जाती धर्मातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रामुख्याने संजीव भोर पाटील, अॅड. अनुराधा येवले, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष स्वाती जाधव, माजी नगरसेवक दिलीप सातपुते, अनिल शिंदे, डॉ.दिलीप पवार, डॉ.अविनाश मोरे, राजूभाऊ शेटे, भरत मोरे, वैभव लाळगे, नितीन पठारे, टिळक भोस, गणेश निमसे, उद्धव माने, लालाभाई शेख, शाहीर मुकुंदा भोर, सुनील साळुंखे, विनय भगत, ज्ञानदेव पांडुळे, शिवश्री दारकुंडे, अनिल शेटे, देवेंद्र लांबे, प्रकाश निपुंगे, बाबा भांड, सोमनाथ शिंदे, संदीप काटे, पांडुरंग पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.निमसे यांनी बीडमध्ये जो प्रकार सुरू आहे तो भयानक आहे. अनेक हत्या या
जिल्ह्यात घडल्या आहेत. बीडसारख्या जिल्ह्यात एक विशिष्ट जात पाहून अधिकारी नेमले जातात. गुन्हे करणारे
आणि त्यांना साथ देणार्या, बेहिशोबी संपत्ती असणार्या गुंड, या गुंडांचे पाठीराखे आणि भागीदार नेत्यांविरूध्द
अजूनही इडी का लावली जात नाही. आता जनतेनेच याविरूध्द उठाव करावा.
संजीव भोर यांनी मोर्चामागील भूमिका स्पष्ट करून कोपर्डी आंदोलनाप्रमाणेच हा महा जनआक्रोश
मोर्चा जास्तीत यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन केले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात
ज्या ज्या बाबी दडपल्या गेल्या आहेत त्या या मोर्चातून चव्हाट्यावर आणल्या जातील, हा मोर्चा राज्यात पुन्हा
एकदा एक वेगळे उदाहरण घालून देईल असा आमचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले.
बैठकीत अॅड. अनुराधा येवले, भाऊसाहेब वाघ, गणेश निमसे, टिळक भोस, दिलीप सातपुते, भरत मोरे,
राजूभाऊ शेटे, गोरख दळवी, शिवशाहीर मुकुंदा भोर, आबासाहेब सोनवणे, श्रीपाद दगडे, लालाभाई शेख,
राजेंद्र कर्डिले, महेश घावटे आदींनी विचार व्यक्त केले. एक कोअर कमिटी बनवून त्यात प्रत्येक
तालुयातील प्रमुख दोन कार्यकर्त्यांचा समावेश केला जाईल. मोर्चाच्या प्रचार प्रसारासाठी प्रत्येक तालुयात
बैठका घेतल्या जाणार आहेत असेही आयोजन कमिटीच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आले. प्रास्ताविक निलेश
म्हसे पाटील यांनी मांडले.