केडगावच्या बायपास जवळ बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा

0
39

नगर – केडगाव मधील बायपास चौका लगत असलेल्या कांबळे वस्ती जवळील सलीम रंगरेज यांच्या शेतात १५ मार्चला रात्री बिबट्या दिसल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. याची माहिती मिळाल्यावर वनपारिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शना नुसार वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी तातडीने भेट देत पाहणी केली. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी १६ मार्चला या परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे. या भागात बिबट्या दिसल्याचा व्हिडीओ काही
नागरिकांनी काढला होता तसेच या ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसेही आढळून आले. या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी बिबट्याने एका कालवडीची शिकार केली होती. याची गांभीर्याने दखल घेत रविवारी सकाळी वनरक्षक विजय चेमटे, चालक संदीप ठोंबरे, वन्यजीव अभ्यासक हर्षद कटारीया यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच परिसरातील नागरिकांना काही सूचना केल्या. बिबट्याला पकडण्यासाठी सायंकाळी या भागात पिंजरा लावण्यात आला आहे. केडगाव परिसरात बिबट्याचे वास्तव्य या आधीही  आढळून आले आहे. नागरिकांनी कोणत्याही आफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच खोट्या भीती व गैरसमज पसरवणार्‍या व्हिडीओ लिप सोशल मीडियावर प्रसारित करू नये, असे आवाहन वनपारिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांनी नागरिकांना केले आहे.