२ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले, २९.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त
नगर – थेट मध्यप्रदेशातुन नगर जिल्ह्यात गांजाची तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. गांजा विक्रीसाठी घेवून आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २९ लाख ६४ हजारांच्या मुद्देमालासह पकडल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. अनिल बाबासाहेब बडे (वय ३४) व बाबासाहेब धनाजी बडे (वय ७०, दोघे रा.हातगाव, ता.शेवगाव) अशी या पकडलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्या माहिती काढुन
त्यांचेविरुध्द कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिनेश आहेर यांना दिलेले आहेत. त्या नुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बिरप्पा करमल, संतोष खैरे, विशाल तनपुरे व शिवाजी ढाकणे यांचे पथक कारवाई साठी नेमलेले आहे. सदर पथक ५ मार्च रोजी शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्दे करणार्या इसमांची माहिती काढत असताना उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना माहिती मिळाली की बाबासाहेब
बडे व अनिल बडे यांनी मोठ्या प्रमाणात गांजा हा अंमली पदार्थ २ कारमधुन विक्रीसाठी आणुन तो त्यांचे घराशेजारील जनावराचे गोठ्यामधील खोलीमध्ये ठेवला असल्याची माहिती मिळाली. पथकाने मिळालेली माहिती शेवगावचे पो.नि.समाधान नागरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांना दिली.उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे पो.नि.समाधान नागरे, स.पो.नि.अशोक काटे, उपनिरीक्षक महाले व पोलीस अंमलदार कृष्णा मोरे, अर्जुन
मुंढे, आदिनाथ शिरसाठ, मारोती पाखरे, किशोर काळे, पाथरकर, संभाजी धायतडक व पांडुरंग मनाळ यांचे संयुक्त
पथक तयार करण्यात आले. या पथकाने बोधेगाव ते हातगाव जाणारे रोडवर बाबासाहेब बडे याचे घरी जाऊन जनावराचे
गोठयात जाऊन खात्री केली असता गोठ्यातील खोलीमध्ये दोघे आढळून आले. त्या गोठ्यामधील खोली व घरासमोरील दोन कारची झडती घेतली असता तेथे ६६.७१० किलो वजनाचा गांजा, २ मोबाईल, १ मारूती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट कार
(क्र. एमएच-११-बीडी-५७५४) व एक मारूती सुझुकी कंपनीची इरटिगा कार (क्र. एमएच-४३ -बीवाय-७७८४ असा एकूण २९ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यातील आरोपी अनिल बडे याचेकडे जप्त करण्यात आलेल्या
गांजा बाबत विचारपुस केली असता त्याने हा गांजा मध्यप्रदेशातील मोतीराम (पुर्ण नाव माहित नाही) याचेकडून विक्रीकरीता आणला असून, आणलेला गांजा तो व त्याचे वडील बाबासाहेब बडे असे मिळून स्थानिक परिसरामध्ये विकत असल्याची माहिती सांगीतली. याबाबत पो.कॉ.शिवाजी ढाकणे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात दोघांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.