नगर – जागतिक महिला दिनानिमित्त माळीवाडा येथील सरस्वती हॉस्पिटलच्यावतीने ‘एक पाऊल स्त्री आरोग्याकडे’ या उपक्रमांतर्गत ८ मार्चपर्यंत दु.३ ते ५ या वेळेत महिलांची मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे माजी नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी स्त्री रोगतज्ञ डॉ.अमोल जाधव, डॉ.प्राजक्ता जाधव, अर्चना परकाळे, स्वाती गहिले, सावेरी सत्रे, मनिषा शिंदे,
आशा शिंदे, कविता रसाळ, शाहिन भाभी, किरण लोंढे, आदेश जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सुवर्णा जाधव म्हणाल्या की, महिला दिनानिमित्त हॉस्पिटलच्यावतीने स्तुत्य उपक्रम राबवुन आई व बाळाची परिपूर्ण काळजी घेत आरोग्यसेवेत बांधिलकीचा नवा मापदंड निर्माण करणार्या माळीवाडा येथील सरस्वती हॉस्पिटल गेली अनेक वर्षापासून कार्यरत आहे. डॉ.अमोल जाधव व डॉ.प्राजक्ता जाधव यांनी या कालावधीत सामाजिक जाणीव ठेवून अत्याधुनिक रूग्णसेवा देण्याचा प्रयत्न केला. त्याला अहिल्यानगरसह जिल्ह्यातून रूग्णांचा प्रतिसाद मिळाला आहे. विश्वासार्हता, प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता या त्रिसूत्रीमुळे आरोग्य क्षेत्रात सरस्वती हॉस्पिटलने ठसा उमटवला आहे. आरोग्य सेवेचा हा नंदादीप असाच तेवत राहील असा विश्वास यानिमित्त व्यक्त केला आहे. डॉ.अमोल जाधव म्हणाले की, सालाबादप्रमाणे याहीवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त एक पाऊल स्त्री आरोग्याकडे या उपक्रमांतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणी, वेदना
विरहित प्रसूती, किशोरवयीन समुपदेशन, लग्नापूर्वी व गर्भधारणेपूर्वीचे समुपदेशन सल्ला केंद्र, अनियमित पाळी व पीसीओडी उपचार, मेनोपॉज मार्गदर्शन तसेच वंध्यत्व निवारण आदींवर मार्गदर्शन व तपासणी केली जाणार आहे. तसेच सवलतीच्या दरामध्ये शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
पुढे बोलतांना डॉ.जाधव म्हणाले की, सक्षमीकरणाची सुरुवात एखाद्याच्या आरोग्याची मालकी घेण्यापासून होते. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यामुळे सर्वांगीण आरोग्य चांगले राहते. स्वत: ची काळजी घेण्याच्या पद्धतींना प्राधान्य देणे, आरोग्याची उद्दिष्टे निश्चित करणे आणि आवश्यकतेनुसार मार्गदर्शन मिळवणे ही महिलांचे आरोग्य प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले आहेत. त्यासाठी हॉस्पिटलच्यावतीने आतापर्यंत महिला सक्षमीकरणासाठी
जोडी तुझी माझी, दिल ये जिद्दी है, पत्र लेखन, प्रेगनन्सी फॅशन शो, अहिल्यानगर फॅशन शो असे अनेक उपक्रम राबवून महिलांना निखळ आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. रूग्णांवर उपचार करण्याबरोबरच त्यांना आनंदी जीवनाचा मंत्र देण्याचा प्रयत्न असतो, असे डॉ.जाधव म्हणाले. डॉ.प्राजक्ता जाधव म्हणाल्या की, आरोग्यसेवेतील आधुनिक
तंत्रज्ञान सरस्वती हॉस्पिटलमध्ये आणून त्याव्दारे रूग्णसेवा देण्यावर कायम भर देण्यात आला आहे. या जोडीलाच डॉ.जाधव यांनी आनंदी समाजाच्या निर्मितीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले आहे. आरोग्यसत्ताक चळवळीतून त्यांनी
संपूर्ण अहिल्यानगर शहर निरोगी, आरोग्यसंपन्न आणि आनंदी राहिल यादृष्टीने महत्वाचे पाउल उचलले आहे. यावेळी अर्चना परकाळे, स्वाती गहिले आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक किरण लोंढे यांनी केले. तर आभार सुवर्णा जाधव यांनी मानले.