राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाची जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
नगर – जिल्ह्यात सध्या विविध संघटनांकडून जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
त्यातून जातीय विषमता वाढत असून सामाजिक शांतता भंग होत आहे. त्यामुळे या प्रकारात शासनाने
तातडीने लक्ष घालून हे प्रकार थांबवावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या
अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात
आली आहे. नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
यांना जिल्ह्यात जातीय तणाव वाढत असलेल्या विविध घटनांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच यावेळी
दिलेल्या निवेदनात जे समाज विघातक लोक समाजात विष पेरण्याचे काम करीत आहे अश्या लोकांना वेळीच
आळा घाला अन्यथा समाज व्यवस्थेवर यांचे दुषपरिणाम निर्माण होतील अशी मागणी करण्यात आली
तसेच मागील चार दिवसांपूर्वी पाथर्डी तालुयातील मढी येथील ग्रामसभेत सरपंच व ग्रामसेवक यांनी
असंविधानिक ठराव मंजूर केले त्यामुळे अश्या चुकीच्या पद्धतीने वागणार्या पदाधिकारी व शासकीय कर्मचार्यांवर
कठोर कारवाई करावी. असे अनेक मुद्दे अल्पसंख्यांक समाजाशी निगडित आहेत, त्या
सर्व विषयात शासनाने लक्ष घालून वेळीच योग्य निर्णय घ्यावे अन्यथा अश्या चुकीच्या पद्धतीने
वागणार्या लोकांमुळे जिल्ह्याचे नाव खराब होईल. कारण नगर जिल्हा हा एक सुसंस्कृत जिल्हा
आहे. अश्या जिल्ह्यात चुकीच्या वागणार्या अधिकारी, पदाधिकारी यांना वेळीच आवर घालण्याची
गरज असल्याचे अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष अथर खान यांनी निवेदनात म्हंटले आहे.
या निवेदनावर समीर पठाण, शहर जिल्हा अध्यक्ष अलतमश जरीवाला, प्रदेश
सचिव फारूक रंगरेज, महिला आघाडी उपजिल्हाध्यक्ष फरीन शेख, रुखय्या शेख,
रफिक बाबुलाल शेख, तालुका अध्यक्ष अल्ताफ शेख, कार्याध्यक्ष मोहसीन पठाण, पारनेर विधान सभा अध्यक्ष
तौफिक पटेल, सचिन नवगिरे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष असीर शेख आदींच्या सह्या आहेत.





