पाककला

0
44

बाजरीची इडली


साहित्य : बाजरीचे पीठ १ वाटी, अर्धा कप रवा, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, अर्धी
वाटी उडीद डाळ, १/४ आंबट दही, १ पॅकेट बेकिंग सोडा किंवा एनो, मीठ चवीनुसार, तुकडे
केलेली हिरवी मिरची, १ टेबलस्पून मोहरी, ७ ते ८ पाने कढीपत्ता, तेल

कृती :  सर्वात आधी एका भांड्यात बाजरीचे पीठ, दही, उडीद डाळ, तांदळाचे
पीठ आणि मीठ एकत्र करून घ्या. आता त्यात पाणी घाला आणि गुळगुळीत पेस्ट तयार करा.
हे पिठ अर्धा तास आंबायला ठेवा. आता त्यात  इनो किंवा बेकिंग सोडा घालून पाणी घालून
पुन्हा मिस करा. इडली स्टँड घ्या, त्यात तेल लावा, तयार मिश्रण घाला आणि वाफ करा.
इडली शिजल्यावर ताटात काढून घ्या. आता एक कढईत तेल घालून हिरवी मिरची, मोहरी
आणि कढीपत्ता घालून फोडणी बनवून घ्या. आता ही फोडणी तयार इडलीवर घालावी.