पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांना ‘वाट’ काढणे झाले मुश्किल

0
21
UNJ

नगर – कृपाल आश्रम मिस्किन परीसरात पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. या परिस्थितीत नागरिकांना पाण्यातून वाट काढणे मुश्किल झाले आहे. पाणी जाण्याकरीता आउटलेट नाही, त्यामुळे पाणी रस्त्यावर साचल्याने घाण वास येत आहे. डास होऊ शकतात. मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिक मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहत असून, प्रशासकिय नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. विशेषतः महापालिकेत प्रशासकराज असल्याने महानगरपालिकेची आणि आयुत यांनी जबाबदारी पार पाडत या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नगरसेवक योगिराज गाडे यांनी केली आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील कृपाल आश्रम परिसर मिस्कीननगर येथे पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असल्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे.

कृपाल आश्रम मिस्किन परीसरातील रस्त्याची माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केली पाहणी, आयुतांचे वेधले लक्ष

या परिस्थितीत नागरिकांना पाण्यातून वाट काढणे मुश्किल झाले असल्यामुळे येथील नागरिकांनी माजी नगरसेवक योगीराज गाडे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. योगीराज गाडे यांनी तत्काळ या परिसराला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व आयुक्तांना पत्र लिहून या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली आहे. योगीराज गाडे यांनी नागरिकांना आश्वस्त केले आहे की, लवकरच या समस्येचे निराकरण होईल व परिसरातील स्वच्छता व आरोग्य टिकविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. योगिराज गाडे म्हणाले की नागरिकाच्या समस्या मिटविणे हे मनपाचे काम आहे. एका पावसात जर पाणी रस्त्यावर साचत असेल तर पुढील मोठया पावसात कसे होईल, असा सवालही त्यांनी केला आहे.