तिळवण तेली समाजातर्फे जिल्हास्तरीय राष्ट्रसंत संताजी महाराज गुणगौरव सोहळा

0
17

नगर – तिळवण तेली समाज ट्रस्ट यांच्या वतीने जिल्हास्तरीय राष्टसंत संताजी महाराज गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्ष प्रसाद शिंदे दिली आहे इयता १० वी १२ वी तसेच CET व NEET परीक्षेमध्ये ७०% पुढील मार्स तसेच क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणारे गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा १६ जून रोजी करण्यात येणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्याना ७० टक्के पेक्षा जास्त गुण असतील अशा विद्यार्थी यांनी गुणपत्रक व आधारकार्डची झेरॉस कॉपीची प्रत तिळवण तेली समाज कार्यलय, संताजी भवन, विठ्ठल रुख्मिणी मंदिर, दाळ मंडई, अहिल्यानगर येथे १२ जूनपर्यंत दुपारी ३ ते ५ यावेळेत जमा करून नाव नोंदणी करावी अशी माहीती देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे, उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर, खजिनदार प्रकाश सेंदर, सचिव शोभनाताई धारक, विश्वस्त सागर काळे, गोकुळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, निताताई लोखंडे आदी परिश्रम घेत आहे. अधिक माहीतीसाठी ९५६१२१७७७७,९८६०५६२९६२,९४२१३३३३३०, ९८६०५६२९६२ या नंबरवरुन संपर्क साधावा असे प्रसाद शिंदे (अध्यक्ष) तिळवण तेली समाज ट्रस्ट मो – ९५६१२१७७७७ यांनी आवाहन केले आहे.