विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नगरचे प्राचार्य सुनिल पंडित यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
53

नगर – नाशिक विभाग शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माजी प्रांत अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ मुंबई महामंडळाचे सहसचिव तसेच नगर येथील प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल पंडित यांनी नाशिक विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे उमेदवारीला अर्ज दाखल केला. अहमदनगर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच तांत्रिक व त्याचप्रमाणे तंत्रनिकेतन तसेच आयटीआय अनुदानविना अनुदान या संस्थांमधील व कायम विनाअनुदानित शाळेतील सर्व शिक्षकांनी आपले जे जिव्हाळ्याचे प्रश्न असतात ते मांडण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील शिक्षकच उमेदवार दिला पाहिजे. व तो शिक्षक संघटनेची सहमत व बांधील असला पाहिजे. ध्येयशील कार्यशील कार्यकर्ता असला पाहिजे असे पंडित यांनी सांगून सर्वांनी एकत्र येऊन यांना पर्याय दिला पाहिजे, अन्यथा या विभागांमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व मुख्याध्यापक संघ ही निवडणूक लढविणार असल्याची माहिती प्राचार्य सुनील पंडित यांनी दिली.

प्राचार्य पंडित यांनी उमेदवार अर्ज दाखल करताना नाशिक विभागाचे महाराष्ट्राचे राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष शरद दळवी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत कार्याध्यक्ष प्राचार्य दिलीप अहिरे, संस्थाचालक संघटनेचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रमुख डॉ.दत्ता निक्रड, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिक्षक सेल प्रा.सखारामजी गारुडकर, महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष प्रसाद सामलेटी तसेच शिक्षक संघटनेचे जिल्हा संघटक व जुन्या पेन्शन योजनेचे संघटक नितीन केणे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका व प्रांत कार्यकारी सदस्यां सुमन हिरे, इतर पाचही जिल्ह्यातून पदाधिकारी उपस्थित होते.