विजयाचा भिंगारमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने जल्लोष
नगर – लोकसभेची निवडणुक ही जनसामान्यांनीच हाती घेतल्यामुळे धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी लढाई होते. यात जनशक्तीचा विजय झाला असून, सर्वसामान्यांचे खा. म्हणून निलेश लंके यांचा विजय जनतेचा विजय आहे. कार्यक्षम आमदार म्हणून ख्याती असलेले निलेश लंके हे आता खासदार झाल्याने भिंगारमधील अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागतील, असा विश्वास आहे. भिंगार कॅन्टोंमेंट हे लष्करी हद्दीत येत असल्याने येथील चटई क्षेत्र, राष्ट्रीय महामार्ग, पिण्याचा पाण्याचा प्रश्न हे केंद्र सरकारद्वारे सुटण्यास खा.लंके यांच्यामार्फत मदत होईल, असा विश्वास सागर चाबुकस्वार यांनी व्यक्त केला. भिंगार शहर महाविकास आघाडीच्या वतीने खा. निलेश लंके हे प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल भिंगार शहर महाविकास आघाडीच्या वतीने जल्लोष करून फटाके वाजवून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, जि. प. सदस्य शरद झोडगे, कॅन्टो. बोर्ड सदस्य विष्णू घुले, भिंगार शहर काँग्रेसचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे भिंगार शहर अध्यक्ष किरण सपकाळ, युवक अध्यक्ष श्रावण काळे, संतोष धिवर, अंकुश शिंदे, सचिन नवगिरे, राजेश काळे, अच्युत गाडे, अक्षय पाथरिया, ख्वाजा पटेल, समीर पठाण, ईश्वर भंडारी, शाम घुले, प्रतिक भंडारी, प्रविण सपकाळ, अजय गवळी, विक्रम गायकवाड आदिंसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी किरण सपकाळ, विष्णू घुले यांनीही खा. निलेश लंके यांच्या विजयाचा जल्लोष करुन नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नाने हे शय झाले आहे. या विजयामध्ये भिंगारवासीयांनीही मोठे योगदान दिले असल्याचे सांगितले.