शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर मनपा आयुक्त डॉ.जावळे यांच्या हस्ते बीजारोपण

0
84

नगर – स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील मान्यवरांना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी रायगडावरील ६ जून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे निमंत्रण दिले जाते. नगर महापालिका आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्यासह नगर जिल्ह्यातील हजारो शिवप्रेमी यात सहभागी झाले होते. हा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा असल्याने काही तरी लक्षात राहील असा उपक्रम करावा असे डॉ जावळेंनी ठरवले होते. सध्या तापमान वाढीचा उच्चांक होतोय; त्यामुळे आपण रायगड परिसरात जिथे झाडे कमी आहे अशा ठिकठिकाणी सिडबॉल टाकु या आणि सुरू होत असलेल्या पावसाळ्यात सदरील मातीच्या गोळ्यातील बीज अंकुरीत होऊन सक्षम होतील असे ठरले.परंतु दोनच दिवसांपूर्वी ठरल्यामुळे व लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल असल्याने आयुक्तांनी घरच्या मंडळींची मदत घेतली. जवळपास दिड हजारांपेक्षा जास्त देशी झाडांच्या बीयांचे संकलन असलेले कर्करोगावरील औषधांवर संशोधन पीएचडी करणारे पर्यावरण प्रेमी भुषण तोडमल, धिरज कुमटकर, मयुर ढगे आणि डॉ जावळे यांच्या मुलांनी एकाच दिवशी या बीया मातीच्या गोळ्यात घालून १५६८ सिडबॉलची निर्मिती केली. ६ जून राज्याभिषेक सुरू होताच सकाळी ९ वाजता शिवरायांच्या घोषणा देत रायगडाच्या पायथ्यापासून ते वरपर्यंत हे सिडबॉल टाकण्यात आले. काही गोळे कारे तलाव मुळशी परिसरात देखिल टाकण्यात आले.

स्मायलिंग अस्मिताच्या साथीने सिडबॉल उपक्रम; छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून कौतुक 

छ्त्रपती संभाजीराजेंनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की महापालिका प्रशासक पदावर असलेल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून रायगड पायी चढताना पर्यावरणाचा महत्वाचा उपक्रम आयुक्त जावळेंनी राबवला हे खूप प्रेरणादायी आहे. राज्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी असे विविध उपक्रम शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने राबविले पाहिजे असे म्हटले. गड उतार होताना महापालिका आयुक्त तसेच भुषण तोडमल, मयुर ढगे धिरज कुमटकर, मिलिंद वलगुडे, शुभम मिसाळ, पप्पू झिने आणि स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी प्लास्टिकच्या शेकडो मोकळ्या बाटल्या गोण्यांमध्ये संकलीत करून पायथ्याशी उत्सव समिती स्वयंसेवकांच्या हवाली करत रायगड परिसर सोडला.