नगरचे सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ शेख यांना राष्ट्रपतींचे मेडल प्रदान

0
32

नगर – सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक शेख अल्ताफ मोहियोद्दीन यांना महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडून जाहीर झालेल्या ‘सराहनीय सेवा मेडल’ राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे ६ जूनला देण्यात आले. राष्ट्रपतींनी २६ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रपतीपदक जाहीर झाले होते. त्याचा अलंकरण समारंभ मुंबईत राजभवनमध्ये मोठ्या थाटात झाला. या समारोहण प्रसंगी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) श्रीमती सुजाता सैनिक, पोलिस महासंचालक श्रीमती रश्मी शुला, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच इतर पोलिस अधिकारी तसेच गौरवविण्यात आलेल्या पोलिस अधिकार्‍यांचे कुटुंबिय उपस्थित होते. अल्ताफ शेख यांना पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ३६८ बक्षीसे मिळाली आहेत. त्यांनी कोतवाली, तोफखाना, कर्जत पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नागरी हक्क संरक्षण विभाग या ठिकाणी उत्कृष्ट सेवा केली आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.