संगमनेरसारखा विकास होण्यासाठी आ.थोरात यांनी अहमदनगर शहरातून निवडणूक लढवून आमदार व्हावे : दीप चव्हाण

0
67

काँग्रेसचे प्रदेश सचिव दीप चव्हाण यांची मागणी 

नगर – नगर शहर बदलतय, त्याची महानगराकडे वाटचाल होतीये, अशा बोगस विकासाच्या कितीही आणाभाका घेतल्या तरी नगर हे निश्चित भौतिक विकासापासून कोसो दूर आहे. त्यामुळे नगर शहराला विकासाच्या प्रगतीपथावर आणण्यासाठी संगमनेर लोणी श्रीरामपूर प्रमाणे नगर शहराचा विकास करण्यासाठी नगरला संगमनेरसारखे शहर करून विकासाचा संगम घडवण्यासाठी जेष्ठ काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगर शहरातून आमदार व्हावे, अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि माजी नगराध्यक्ष दीप चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदार संघात जो निकाल लागला त्यावरून विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे मोठा उलटफेर होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. नगरकरांनी फसवा विकास दाखवणार्‍या विद्यमान खासदाराला पराभूत केले. त्यानंतर आता नगर शहर विधानसभा मतदारसंघात शहराच्या सर्वांगीण विकासाची जाण असलेले नेतृत्व मिळावे अशी नगरकरांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने दीप चव्हाण यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उबाठा आणि मित्रपक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून बाळासाहेब थोरात यांच्या नावाला सर्वांनी मान्यता द्यावी. आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू असे म्हटले आहे.

आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात त्यांच्या रूपाने संगमनेरला थोरात यांचे उत्तरदायित्व या आमदारकीच्या निवडणुकीत मिळावे आणि थोरात यांनी नगरमधून निवडणूक लढवावी म्हणजे नगर शहराचा संगमनेर प्रमाणे शाश्वत विकास होईल. या संदर्भात लवकरच आपण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार, महाविकास आघाडीचे समन्वयक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नगर शहराच्या विकासासाठी आग्रही असलेल्या राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह भेट घेणार आहेत. नगर शहराची जागा काँग्रेस पक्षाला सोडून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात यावी अशी सर्वांना गळ घालणार आहोत, असेही दीप चव्हाण यांनी म्हंटले आहे.