शेतातील ऊस पेटवून देत केले नुकसान

0
114

नगर – शेतकर्‍याच्या शेतात १५ गुंठे क्षेत्रात असलेला ९ महिने कालावधीत वाढलेला ऊस एकाने पेटवून देत शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान केल्याची घटना नगर तालुयातील जखणगाव शिवारात घडली आहे. याबाबत मनीषा जालिंदर नरवडे (रा. टाकळी खातगाव, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.६) सायंकाळी फिर्याद दिली आहे

फिर्यादी यांचे मालकीचे जखणगाव शिवारात शेत असून या शेतात १५ गुंठ्यात लावलेला आणि ९ महिन्यांची वाढ झालेला ऊस संदीप आबासाहेब पानसरे याने दि. १ जून रोजी दुपारी १.३० च्या सुमारास कशाने तरी पेटवून देवून सुमारे १८ हजार २०० रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी पानसरे यांच्या विरुद्ध भा.दं. वि. कलम ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.