निंबळक शिवारात रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू

0
30

नगर – रेल्वे मार्ग ओलांडताना रेल्वे गाडीची धडक बसून २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना निंबळक (ता.नगर) शिवारात गुरुवारी (दि.६) रात्री ८ च्या सुमारास घडली. कुमार भगवान शिरसाठ (रा.निंबळक, ता.नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. मयत कुमार हा अविवाहित होता, तसेच तो काहीसा कर्णबधीर होता. त्यामुळे निंबळक शिवारात रेल्वे मार्ग ओलांडत असताना त्याला भरधाव वेगात आलेल्या रेल्वेगाडीचा अंदाज आला नाही व त्याला रेल्वेगाडीची जोरदार धडक बसली. त्यात तो गंभीर रित्या जखमी झाला.

त्याला त्याचे नातेवाईक दत्तात्रय साठे यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. खेडकर यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबतची माहिती दवाखाना ड्युटीवर असलेले तोफखाना पोलिस स्टेशनचे पो.हे.कॉ. गोर्डे यांनी एमआयडीसी पोलिसांना कळविली. या माहितीवरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पो.ना. संदीप पितळे हे करत आहेत.