नगर – अज्ञात कारणातून राहत्या घरी विषारी औषध प्राशन केलेल्या ३० वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.६) दुपारी १.३० च्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. प्रवीण नामदेव भोर (रा. वाकोडी, ता.नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. मयत प्रवीण हा अविवाहित होता, त्याच्या आई वडिलांचे ही निधन झालेले आहे. त्याला एक भाऊ आहे. त्याने सोमवारी (दि.३) सकाळी ७ च्या सुमारास राहते घरात काहीतरी विषारी औषध घेतले. त्यामुळे त्याला त्याचा भाऊ सुनील भोर यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरु असताना गुरुवारी (दि.६) दुपारी १.३० च्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. मोहरकर यांनी घोषित केले. याबाबतची माहिती दवाखाना ड्युटीवर असलेले तोफखाना पोलिस स्टेशनचे पो.हे.कॉ. जी. जी.गोर्डे यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना कळविली. या माहितीवरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पो.हे.कॉ. हे करत आहेत.