काटवण खंडोबा रस्त्याची पहिल्या पावसातच दुरावस्था

0
42

नगर – पहिल्याच पावसाने काटवण खंडोबा रोड, संजय नगर येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. येथील रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली आहे. नागरिकांना खराब रस्ता असल्याने नागरिकांना आटापिटा करत घरी जावे लागते. पावसाच्या बारीक सरी पडूनही रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. या रस्त्यावर मंगल कार्यालय असल्याने लग्नासाठी आलेल्या वर्‍हाडींची तारांबळ उडत आहे.

स्थानिक नगरसेवकांनी रस्त्याच्या कामांसाठी अनेक वेळा पाहणी करूनही रस्त्याचे काम खोळंबले आहे. सीना नदीवरील काटवण खंडोबा रोड हा शहराचा अत्यंत जवळचा रस्ता असल्याने या रोडवर नागरिकांची गर्दी असते. रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. काटवण खंडोबा रस्ता दुरुस्ती व्हावा अशी नागरिक मागणी करत आहेत.