‘नगर अर्बन बँके’तील आर्थिक घोटाळा प्रकरणातील आरोपींच्या मालमत्तांवर कायदेशीर कारवाईस विलंब

0
70

सभासद राजेंद्र चोपडा यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र, निवडणूक आटोपल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घालावे

नगर – नगर अर्बन मल्टीस्टेट को ऑप. बँकेतील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यास प्रशासनाकडून विलंब होत आहे. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी ठेवीदारांना आश्वासन देताना आरोपींच्या मालमत्तांबाबत कायदेशीर कारवाई वेगाने करू असे सांगितले होते. प्रत्यक्षात अशी कोणतीही कारवाई झालेली नाही. भ्रष्टाचाराविरोधात नेहमी आक्रमक बोलणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता निवडणुका संपल्याने नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याचा वेगाने तपास होईल व खर्‍या आरोपींवर कायदेशीर कारवाई होईल या दृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली आहे. राजेंद्र चोपडा यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले असून या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक, पोलिसअधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षकांनाही पाठवल्या आहेत. राजेंद्र चोपडा यांनी नमूद केले आहे की, नगर अर्बन बँक घोटाळ्यातील गुन्ह्यामध्ये फॉरेन्सिक ऑडीटमध्ये १०५ लोक आरोपी म्हणून निष्पन्न झालेले आहे. त्याबाबत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झालेला आहे.

आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर, एस.पी. ऑफीस यांचेकडे याचा तपास चालू आहे. या आरोपींवर एम.पी.आय.डी. कायदा लागू केलेला आहे. परंतु दुर्देवाने कोणतीही कारवाई झालेली दिसून येतनाही. स्व. दिलीप गांधी यांच्या पत्नी सौ. सरोज गांधी यांच्या तसेच सुवेंद्र दिलीप गांधी व देवेंद्र दिलीप गांधी यांचे सर्व मालमत्तांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून शासनाचे नांव लावावे. काही जमिनी त्यांनी आत्ता विकल्याअसल्यासत्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे जप्त कराव्यात व त्यांना चौकशीसाठी आणल्यावर किंवा अटक केल्यावर त्यांच्या बेनामी स्थावर मालमत्ता कारवाई करूनताब्यात घ्याव्यात. पोलीस खात्यामार्फत आजपर्यंत १०५ आरोपींपैकी १० ते १२ आरोपींनी अटक झालेलीआहे. १०५ आरोपी मध्येकाही निरपराध संचालक व काही निरपराध कर्मचारी आहेत. तसेच योग्य तपास न केला गेल्यामुळे बँक बचाव समितीच्या सदस्यांनी आणखी जे मोठ मोठे कर्ज घेऊन फसवणारे लोकं, ज्यांची नांवे या आरोप पत्रात आलेली नाहीत, तसेच ज्यांच्या वेगवेगळ्या बँकेच्या खात्यांमधून मोठमोठ्या रकमांची देवाणघेवाण झालेली आहे, याची माहिती कळविलेली आहे.

या संदर्भात आर्थिक गुन्हेशाखेनेचौक शीकरूनताबडतोब त्यांचीनावेसुद्धा या पुरवणीआरोपपत्रामध्ये व बँक बुडविणार्‍या लोकांच्या यादीमध्ये, मोठ्या कर्जदारांच्या यादीमध्ये घातली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे १ कोटी ३ लाख आणि १ कोटी ४७ लाख रूपयांच्या चिल्लर घोटाळा या बँकेत करण्यात आलेला आहे. याची देखील चौकशी व्हावी. नगर अर्बन बँकेच्या सदरच्या ८२० कोटी रुपयांच्या धोटाळ्यासंदर्भात पोलीस अधिकार्‍यांना आयकर विभागाच्या अधिकार्‍यांची मदत घेतल्यास या सर्व गुन्ह्याची उकल होण्यास मदत होेईल या सर्व संबंधीत गुन्हेगारांनी कोट्यावधी रुपये एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पळवापळवी केलेली आहे याचा सर्व खुलासा तात्काळ मिळेल. बँकेला भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदाराने बुडविलेले आहे. त्याचबरोबर काही इतर संचालक आणि काही वरिष्ठ अधिकारी यांनी देखील त्यामध्ये आर्थिक घोटाळे केलेले आहेत. त्याचबरोबर काही इतर संचालक आणि काही वरिष्ठ अधिकारी यांनी देखील त्यामध्ये आर्थिक घोटाळे केलेले आहेत. आरोपींच्या यादीतील पहिली ६ नावे स्व. दिलीप गांधी यांचे परिवारातील आहेत. परंतु आरोपी नं. २ ते ६ यांना अद्यापपर्यंत पोलिसांनी अटक केलेली नाही. या सर्व आरोपींच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मोबाईल नंबरला ट्रॅक केल्यास त्याम ध्ये आरोपींचा ठावठिकाणा तात्काळ मिळेल. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अत्यंत स्वच्छ व पारदर्शक कारभाराची अपेक्षा होती व आहे. या आर्थिक घोटाळ्यामध्ये न्याय देण्यासाठी गोरगरिबांना त्यांचे पैसे मिळवुन देण्यासाठी अहमदनगर येथे एक दिवसाची भेट द्या व हा सर्व विषय जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात मिटींग घेऊन समजावून घ्या. या बँकेतील घोटाळ्याचा संपुर्ण घटनाक्रम हा महाराष्ट्राचे महसुलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना माहिती आहे. विषयात गांभीर्याने लक्ष घालावे अन्यथा न्याय मिळण्यासाठी हायकोर्टामध्ये दाद मागावी लागेल, असेही चोपडा यांनी पत्रात नमूद केले आहे.