एमआयडीसीमधील आकाश कंपनीला आग; ३० ते ४० लाखांचे नुकसान

0
19

नगर – एमआयडीसी मधील आकाश प्रिसिजन कॉम्पोनन्टस् कंपनी मधील असेम्ब्लिंग विभागाला बुधवारी (दि.५) रात्री साडे आठ वाजता शोर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत तयार करण्यात आलेले लाखो इलेट्रिकल कॉम्पोनन्टस्, स्टार्टर्स व मोटर्स, इलेट्रिक बाईकचे पार्टस् व वातानुकूलित यंत्रणा जाळून खाक झाली. या पार्टस् मध्ये चांदी व तांबे वारण्यात येत असल्याने आगीत आकाश कंपनीचे सुमारे ३० ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सहकार्य केले. लाईट नसल्याने आग विझवण्यास काही प्रमाणात अडथळा आला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. एमआयडीसी बी ३९ येथे असलेल्या आकाश प्रिसिजन कॉम्पोनन्टस् कंपनीचे संचालक श्रीकृष्ण जोशी यांनी आग लागताच एमआयडीसी मधील अग्निशमन दलास माहिती देवून पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळात आग आटोयात आणल्याने पुढील अनर्थ टळला. एमआयडीसी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

याबाबत आकाश प्रिसिजन कॉम्पोनन्टस् कंपनीचे संचालक श्रीकृष्ण जोशी माहिती देताना म्हणाले, बुधवारी रात्री कंपनी मधील असेम्ब्लिंग विभागाला शोर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. धुराचे लोट बाहेर येवू लागण्याचे कंपनी मधील कामगारांना दिसले. त्यांनी ताबडतोब पाणी व अग्निशमन उपरणे वापरण्यास सुरवात केली. पण आग लागलेल्या ठिकाणी आलेले प्रोडट हे प्लॅस्टिकचे असल्याने आग वाढली. त्यात इलेट्रिकल कॉम्पोनन्टस्, स्टार्टर्स व मोटर्स, इलेट्रॉनिक बाईकचे पार्टस् व वातानुकूलित यंत्रणा आगीत भस्मसात झाले. एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी सहकार्य करत आग आटोयात आणली. रात्रीची वेळ असल्याने कंपनी मधील असेम्ब्लिंग विभाग बंद असल्याने. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी खूप सहकार्य केले.