पोलिस ठाण्यात अडीच लाख रुपयांच्या चोरीचा दुसरा गुन्हा दाखल
नगर – एमआयडीसी परिसरातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष करणार्या आणखी काही कार्यकर्त्यांच्या गळ्यातील अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चेन चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चोरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.५) दुपारी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडावून मध्ये मंगळवारी (दि.४) शिर्डी आणि नगर लोकसभा निवडणुकीची मतम ोजणी झाली. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी सायंकाळच्या सुमारास मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीत काही चोरट्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या खिशातील पाकिटे,अनेकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरल्या. त्यातील एका चोरट्याला काहींनी चोरी करताना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. राजेंद्र वसंत शिंदे (रा. पाथर्डी) असे या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत सचिन मोहन शिंदे (रा. सप्रे मळा, बोल्हेगाव फाटा) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून मंगळवारी (दि.४) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर बुधवारी (दि.५) दुपारी स्वप्नील सुखलाल ठाणगे (रा. भारत बेकरी जवळ, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली असून मंगळवारी (दि.४) रात्री ११.१५ ते ११.३० या दरम्यान मतमोजणी केंद्रा बाहेर अज्ञात चोरट्याने आमच्या गळ्यातील अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चेन चोरल्या असल्याचे म्हंटले आहे. या फिर्यादीवरूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.