नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीनंतर सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून यामुळे पुन्हा एकदा खरेदीदारांच्या खिशाला कात्री बसताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोन्या आणि चांदीच्या वायदे व्यवहारात तेजी दिसत आहे तर सलग दुसर्या दिवशी दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमती महागल्या आहेत, विशेषतः चांदीच्या दरात विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या वायदे दरात तेजीची शयता आणखी तीव्र झाली आहे.
सोन्याचा भाव पुन्हा महागला
सोन्याच्या वाडे किंमतीत सलग दुसर्या दिवशी वाढ नोंदवली गेली आहे. मल्टी कमोडिटी एसचेंज वर सोन्याचा ऑगस्ट वायदा ३०० रुपयांनी वाढून ७२,९०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला असून सकाळपासून सोन्याच्या वायदे किंमतीत वाढीसह व्यवहार होत आहेत. सुरुवातीच्या सत्रात तेजीसह ओपनिंग केल्यावर ऑटोबर सोन्याचे फ्युचर्स भाव ७३,१६६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहेत. गेल्या महिन्यात सोन्याची वायदे किंमत ७४,४४२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली होती.
चांदीच्या दरात विक्रमी उसळी
दुसरीकडे, सोन्यापाठोपाठ चांदीच्या वायदे दरातही विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. एमसीएस वर जुलै चांदीचे फ्युचर्स १,१४० रुपये वाढीसह ९१,५८४ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत असताना सप्टेंबर चांदीचा भाव १,०८९ रुपयांनी वाढून ९३,४१५ रुपयांवर पोहोचला तर डिसेंबर चांदीची फ्युचर्स किंमत १,३४४ रुपयांनी वाढून ९५,७४५ रुपयांवर पोहोचली आहे. बुधवारीही सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली तर आज, गुरुवारी सकाळपासूनच सोन्या चांदीच्या दरात तेजी दिसत आहे. अशा स्थितीत, जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत बाजारातील मागणीमुळे दोन्ही मौल्यवान धातूची किंमत आणखी महागण्याची शयता आहे. दुसरीकडे, गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसारही २२ आणि २४ कॅरेट सोने-चांदीचे दर महागले आहेत.