राष्ट्रवादी काँग्रेसचा १० जून रोजी नगरमध्ये वर्धापनदिन कार्यक्रम

0
27

नगर – १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन असून. अहमदनगर शहरांमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यास राष्ट्रवादी पक्षाचे सर्व नवनिर्वाचित खासदार उपस्थित राहणार आहेत तसेच निवडणूक काळामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई पाहायला मिळाली एक सामान्य शिक्षकाचा मुलगा व पन्नास वर्षाची राजकीय कारकीर्द असलेल्या उमेदवारांमध्ये ही लढाई पाहायला मिळाली परंतु जनतेने ही लढाई हातात घेतली असल्या कारणाने निकाल स्पष्ट दिसत होता आणि निलेश लंके हे खासदार झाले अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केली, तसेच निलेश लंके यांच्या विजय उत्सवामध्ये भाजपचे माजी नगरसेवक भैय्या परदेशी हेदेखील सामील झाले होते यावर बोलताना अभिषेक कळमकर म्हणाले की लागलेला निकाल हा त्यांनी मान्य केलेला असून ते आमच्या आनंदात सहभागी झाले त्यांनी आमचे पेढे जरूर खावे असे कळमकर म्हणाले.