नगर – प्रभाग १२ मधील सौभाग्य सदन मंगल कार्यालय परिसरात अज्ञात विघ्न संतोषी लोकांनी दारूच्या बाटल्या तसेच सोड्याच्या बाटल्या फोडून काचेचा ढीग केल्याचे आढळून आले आहे. याबाबत परिसरातील माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे आक्रमक झाले असून या परिसरात राहणार्या कुटुंबांना या विघ्नसंतोषी लोकांपासून गेल्या काही दिवसांपासून त्रास होत असून रात्री बे रात्री दारूच्या बाटल्या आणून मोठ्याने आरडाओरडा सुरू असतो. या त्रासाला कंटाळून येथील नागरिकांनी माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना आज येथील परिस्थिती दाखवली यावर माजी नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले त्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त व आरोग्य अधिकार्यांवर चांगले ताशेरे ओढले. या भागातले महानगरपालिकेचे असलेले मंगल कार्यालय अत्यंत दुरावस्थेत असून येथे काही स्थानिक आपली जनावरे बांधत असून त्यामुळे देखील येथे मोठी घाण व दुर्गंधी पसरलेले आहे.