निकालानंतर दुसर्‍या दिवशी शेअर बाजारात तेजी परतली

0
39
xr:d:DAFyheUoWQ4:6,j:7692555554110656871,t:23102805

 

 

सेन्सेस ९५०० अंकांवर वधारला; प्री-ओपनिंगमध्ये ७३ हजारांच्या पुढे झेप

मुंबई – मंगळवार चा (दि.४) दिवस शेअर बाजारासाठी खूपच कठीण ठरला. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा फटका शेअर बाजाराला बसला आणि मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र, बुधवारी (दि.५) बाजाराच्या सुरुवातीला काहीशी रिकव्हरी होताना दिसत असून सेन्सेस ९५०० अंकांवर वधारला आणि प्री-ओपनिंगमध्ये ७३ हजारांच्या पुढे झेप घेण्यात यशस्वी ठरला. लोकसभा निवडणुक निकालाच्या दिवशी मंगळवारी शेअर बाजारात मोठा भूकंप झाला. बॉम्बे स्टॉक एस्चेंजचा (बीएसई) सेन्सेस ६,००० हून अधिक अंकांनी आपटला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी १,९०० अंकांवर घसरला होता. परंतु बाजार बंद होईपर्यंत सुमारे २,००० अंकांची रिकव्हरी झाली आणि बुधवारी (दि.५) सकाळी बाजार वाढीसह ओपन झाला आणि दोन्ही सेन्सेस-निफ्टी निर्देशांकांनी हिरव्या चिन्हावर व्यवहार करण्यास सुरुवात केली. मंगळवारी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालाचा फटका शेअर बाजाराला बसला आणि मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र, बुधवारी सकाळी देशांतर्गत बाजारात काहीशी रिकव्हरी होताना दिसत असून सेन्सेस ९५० अंकांनी चढून ७३ हजारांच्या पुढे ओपन झाला. यादरम्यान, सुरुवातीच्या अंतरात आय टी शेअर्स १ टक्क्यांहून अधिक वधारले जे कालच्या ऑलराउंड विक्रीतही मजबूतीने तग धरून उभे होते. याशिवाय सुरुवातीच्या सत्रात एफ एम सी जी क्षेत्रातील शेअर्समध्ये उत्साह दिसत असून केवळ बाजाराला काही प्रमाणात पाठिंबा देताना दिसत आहेत.

शेअर बाजारात तेजी-मंदीचा खेळ

बीएसई सेन्सेस प्री-ओपनिंगमध्ये ९४८.८४ अंक किंवा १.३२ टक्के उसळी घरून ७३,०२७ अंकावर उघडला तर एनएसई निफ्टीने २४३.८५ अंकांची झेप घेऊन २२,१२८ अंकावरून व्यापार सुरू केला. सेन्सेसमध्ये अधिक हालचाल दिसत असून निर्देशांकात सतत चढ-उतार दिसून येत आहेत. सकाळी मार्केट ओपनिंगच्या काही मिनिटांत सेन्सेस ४५३ अंकांनी वाढून ७२,५३२ अंकांवर घसरला तर, काही मिनिटांत निर्देशांकाने तेजी गमावली आणि सध्या १२२.८२ अंकांनी किंवा ०.१७ टक्के घसरून ७१,९५६ अंकांवर पोहोचला. त्याचवेळी, एन एस ई निफ्टीनेही किंचित तेजी नोंदवली परंतु निर्देशांची १२० अंकांनी वाढून २२,००५ वर व्यवहार करत आहे.

कोणत्या शेअर्सनी मारली मुसंडी

सुरुवातीच्या सत्रात बीएसई सेन्सेसच्या २२ स्टॉकमध्ये तेजीची हिरवळ तर ८ शेअर्समध्ये घसरणीच्या लाल रंगाचे वर्चस्व राहिले. एच यु एल ५ टक्के वाढीसह सर्वाधिक लाभार्थी ठरला तर नेस्ले शेअर्स ३.७५% वधारले असून एशियन पेंट्स ३.२० टक्के तर एचसीएल टेक २.२३ टक्के वधारले. त्याचवेळी, एचसीएल टेक २.२२ टक्के तर टाटा स्टील २.१४ टक्क्यांनी तेजीत दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टीच्या ३१ समभागांमध्ये वाढ आणि १९ समभाग घसरताना दिसत आहेत. येथेही एच यु एल सर्वाधिक लाभदायक ठरला आणि ५.८५ टक्के तर ब्रिटानिया ५ टक्के वधारला असून टाटा कन्झ्युमर ४.२० टक्के तर एशियन पेंट्स ३.९४ टक्क्यांनी वधारले आहेत.