नगर शहर परिसरात ३ अपघातांत ३ जण ठार

0
58

नगर – नगर शहर परिसरात गुरुवारी (दि. ३० एकाच दिवसात मनमाड रोड, कल्याण रोड व पुणे रोड वर झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघाजणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोघा तरुणांचा आणि एका वृद्धाचा समावेश आहे. तिन्ही अपघात प्रकरणी एमआयडीसी, तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. पहिला अपघात नगर कल्याण रोडवर रेल्वे उड्डाण पुलाच्या पुढे बायपास चौकाजवळ गुरुवारी (दि.३०) पहाटे १ च्या सुमारास झाला. या अपघातात अंकुश गहिनीनाथ गर्जे (वय २७, रा. सुरुडी, ता. आष्टी, जि. बीड) याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास त्याचे नातेवाईक विठ्ठल उत्तम सांगळे यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. आर. के. कुलकर्णी यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

याबाबत आलेल्या दवाखाना नोंदीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. दुसरा अपघात नगर मनमाड रोडवर विळद घाटात रात्री ९ च्या सुमारास झाला. यामध्ये अनिल दशरथ बर्डे (वय ३१, रा. चिंचोली, ता. नगर) हा मयत झाला आहे. अपघातात तो जखमी झाल्यावर परिसरातील नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून त्यास उपचारासाठी रात्री ९.४५ च्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. आर. के. कुलकर्णी यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबत आलेल्या दवाखाना नोंदीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.