केडगावात एसटी बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

0
52

नगर – पुणे महामार्गावर केडगाव येथील सोनेवाडी चौकात एसटी बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाला आहे. रावसाहेब मळूजी काळे (वय ७० रा. अस्तगाव, ता. पारनेर) असे मयताचे नाव आहे. गुरुवारी (दि.३०) दुपारी ३.३० च्या सुमारास हा अपघात झाला. मयत काळे हे दवाखान्यात उपचारासाठी केडगाव येथे आलेले होते. तेथून गावी जाण्यासाठी सोनेवाडी चौकात ते रस्ता ओलांडत असताना नगर ते घोसपुरी जाणार्‍या एस.टी.बस खाली सापडून ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी नगरमधील पॅसीफिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना सायंकाळी ७.२० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे मेडिकल ऑफिसर डॉ. प्रशांत जाधव यांनी सांगितले. याबाबत आलेल्या दवाखाना नोंदीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मयत रावसाहेब काळे हे अस्तगाव गावचे पाटील होते. त्यांच्या पश्चात ३ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.