रस्ता व पुलाच्या कामामुळे शहरातील वाहतुकदारांनी पर्यायी मार्ग वापरावा

0
26

नगर – महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत मनपा हद्दीतील हॉटेल फरहत ते हसन शाह कादरी कब्रस्तान ते भिंगारनाला ते कानडे मळा, जुना सोलापूर रोड ते चौधरी नगर, जुना सोलापुर रोड या रस्त्यावर पुलाचे काम चालू होणार आहे. सदर पुलाचे काम करत असताना कोणत्याही प्रकारे डायव्हर्जन करण्यासाठी व्यवस्था नाही. त्याकरीता सदरचा रस्ता पुलाच्या ठिकाणी पूर्णपणे वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

त्याकरीता सदर रस्त्यावरून जाणार्‍या वाहतूकदारांनी पर्यायी मार्ग द्वारे म्हणजे ‘हॉटेल फरहत ते राजश्री हॉटेल ते हसनशहा कादरी कब्रस्तान ते पॉलीटेनिकल कॉलेज ते सिताबन लॉन ते राऊत मळा ते सारसनगर महात्मा फुले चौक ते सारसनगर, भिंगारनाला चौक ते वेताळबाबा चौक ते गाडळकर मळा ते विठ्ठल मंदिर, कानडे मळा या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे मनपाने म्हटले आहे.