जाहिरातीच्या फलकामुळे बंद झालेली तिरंगा लाईट चालू करा अन्यथा आंदोलन

0
54

नगर-शहरातील वॉर्ड क्र.५ मधील तोफखाना पोलिस स्टेशन ते भिस्तबाग पर्यंत टुब्लरपोलला तिरंगा लाईट बसविण्यात आली होती. ३ ते ४ महिन्यांपासून ती बंद आहे. जाहिरातींचे बोर्ड लावल्यामुळे ते बंद असून ५ जूनपर्यंत सदरचे लाईट चालू करावी, अन्यथा ६ जून रोजी नागरिकांसह आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी दिला आहे. महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वॉर्ड क्र.५ मध्ये तोफखाना पोलिस स्टेशन ते भिस्तबागचौकापर्यंत एकूण ७२ पोल असून पोलला तिरंगा लाईट बसविण्यात आलेले होते. त्यामुळे सदर उपनगराचा तिरंगा लाईट अत्यंत चांगल्या प्रकारे दिसत होता.

या रोडवर येणार्‍या जाणार्‍या नागरिक चांगल्या प्रकारे तिरंगा लाईटचा आनंद घेत होते. परंतु सदर रोडच्या पोलवर जाहिरातचे बोर्ड हे ४ महिन्यांंपूर्वी लावल्यामुळे तिरंगा लाईट पूर्णपणे बंद आहे. लाईट जाहिरातीचे बोर्ड लावल्यामुळे बंद आहे. जाहिरातीचे बोर्ड लावणारे संबंधित ठेकेदार यांना जबाबदार धरून लाईट ५ जूनपर्यंत चालू करण्याची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा ६ जून रोजी प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये उपनगरातील सर्व नागरिकांसमवेत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.