शोध मोहिम सुरु असताना घडली दुर्घटना
अकोले – प्रवरा नदीत बुडालेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी आलेल्या नाशिक येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाची बोट आज सकाळी उलटून या पथकातील चार जणांसह एकूण पाच जण प्रवरा नदी पात्रात बुडाले. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले असून अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे. बुधवारपासून याठिकाणी झालेल्या अपघातात एकूण चार जण बुडून मृत्यू पावले असून बुडालेल्या अन्य तिघांचा अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. बुधवारी शोध मोहिम सुरु असताना घडली दुर्घटना (दि.२२) दुपारी अकोले तालुयातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदी पाञात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले (वय २५ रा. धुळवड, ता सिन्नर) व अर्जुन रामदास जेडगुले (वय १८ ,रा .पेमगिरी, तालुका संगमनेर) हे दोघे तरुण बुडाले होते. त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह कालच सापडला तर अर्जुन जेडगुले याचा शोध सुरू होता, पण काल त्याला यश आले नाही. या तरुणाच्या शोध घेण्यासाठी नाशिक येथील आपत्ती व्यवस्थापनाचे पथक गुरुवारी (दि.२३) सकाळी घटनास्थळी दाखल झाले. या तरुणाचा तपास सुरू असतानाच शोध पथकाची बोट उलटून पथकातील चार व स्थानिक युवक गणेश मधुकर देशमुख (वय ३७, रा.सुगाव बुद्रुक) असे पाच जण बुडाले. यातील तिघांचा बुडाल्यामुळे मृत्यू झाला आहे.
बुडालेल्या पैकी प्रकाश नामा शिंदे, वैभव सुनील वाघ व राहुल गोपीचंद पावरा (सर्व रा. धुळे) या तिघांना बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, या सर्वांना पुढील उपचारासाठी अकोले येथील खाजगी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते मात्र या तिघांनाही वाचविण्यात डॉटरांना यश आले नाही. तर वाचवलेल्या पंकज पंढरीनाथ पवार (वय ३३, रा.धुळे) या चौथ्या तरुणावर प्रारंभी अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असली तरी त्याला अंडर मेडीसीन ठेवण्यासाठी खाजगी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदी पात्रातील पाझर तलावामधून पडणार्या पाण्याचा दाब अधिक असून तेथे भोवरा असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही दुदैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान घटनास्थळी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. किरण लहामटे,माजी आमदार वैभवराव पिचड यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक नागरिकांसह अकोले तालुयातील नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी केली आहे.