गुरुभक्तांच्या उपस्थितीत ‘गुरुआनंद तीर्थ’वर ‘भूमीशुद्धीकरण आणि वृक्षारोपण’ कार्यक्रम

0
59

नगर – महापुरुषांच जीवन पाण्याच्या धारेसमान असते, जी आधी एकदम छोटी असते, ती वाढत जाऊन पुढे सागर बनते. गंगोत्री गंगासागराचे रूप घेते त्याप्रमाणे महापुरुषांचे जीवन सुरुवातीला छोटे असते ते वाढत जाउन विराट होते व शेवटी – अनंत होते अशा महापुरुषांकडून झालेल कार्य विश्वव्यापी असते, त्यांनी केलेले चिंतन विश्वाला उपयोगी पडत व हे महापुरुष विश्वाचे प्रतिनीधीत्व करतात, विश्वाला मार्गदर्शन करतात. असेच आजच्या युगातील एक महान महापुरुष आचार्य सम्राट श्री आनंदत्रपीजी महाराज, ज्यांच कर्तृत्व हीमालयासारख व करुणा सागरासारखी. अशा महापुरुषाचा, श्रमण आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांचा जन्म ज्या गावी झाला ती चिचोंडी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली. अशा पावन उर्जेने संपन्न चिचोंडीत त्यांचेच सुशिष्य महापुरुष उपाध्याय श्री प्रवीणऋषिजी महाराजांच्या प्रेरणा व कुशल मार्गदर्शनात ‘गुरु आनंद तीर्थ ’हे भव्य दिव्य तीर्थ उभारणीचे काम गुरु आनंद फाउंडेशनद्वारे सुरू झाले. यातील पहील्या टप्प्याचा लोकार्पण समारोह १७ डिसेंबर २०१७ रोजी सुमारे दहा हजारांहून जास्त गुरु भक्तांचा उपस्थित उत्साहात पार पडला. केवळ धार्मिकच नाही तर मानव सेवा, समाज प्रबोधन, शिक्षण, व्यक्ती व समाज विकास- कल्याण अशा अनेक प्रयोजनातून येथे सप्ततीर्थ निर्माती होत आहे. यामध्ये आत्तापर्यंत गुरुचरण तीर्थ, साधु भवन, साध्वी भवन, भक्तनिवास, भोजनालय पुर्ण झाले असून नवकार कलश – गौतम लब्धि पीठ, श्रुतपीठ गर्भसंस्कार केंद्र, संलेखना केंद्र, अष्टमंगल ध्यान केंद्र, भव्य दिव्य पुरुषाकार – अष्टमंगल कमलाकृती ध्यान केंद्र आदींचे निर्मीती कार्य प्रगतिशील आहे १८ मे रोजी चतुर्विध शासन स्थापना दिवशी साधु साध्वी केंद्र, आडीटोरीयम – कार्यालय आणि अर्हम तीर्थ या सर्वांचे भुमीशुध्दीकरण तसेच अर्हम विज्जा रिसर्च प्रकल्पाच्या नियोजित स्थानी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हजारो गुरुभक्तांच्या उपस्थित झाला. साध्वी साधना केंद्र हे पुणे येथील उद्योगावती, निष्ठानंत गुरुभक्त रमणलाल कपूरचंद लुंकड़ वित्त सहयोग – समर्पणाने निर्मित होत आहे.

अर्हम तीर्थामुळे ’बाराही महीने अर्हम विधीचा, तंत्राचा गुरुभक्ताना लाभ मिळेल हे तीर्थ देशभरातील समस्त गुगळे परीवारा वित्त सहयोग – समर्पणाने निर्मित होत आहे. श्रमण साधना केंद्र व ऑडीटोरीयम हे अनाम गुरुभक्तांचा समर्पणातून निर्माण होत आहे. अर्हम विज्जा फाउंडेशनच्या माध्यमातून क्रांतिकारी विचार उपाध्याय श्री प्रविणऋषीजींच्या प्रगल्भ, सखोल मार्गदर्शनात चालणार्‍या विविध साधनांचा लाभ आज भारतच नाही तर विदेशातील लाखो लोक घेत आहेत. या सर्व उपक्रमांचा अभ्यास, रीसर्च मार्गदर्शन करण्याहेतू अर्हम विज्जा युनिर्वसीटीचे निर्माण होत आहे. यासाठी सुश्रावक, समर्पित गुरुभक्त पोपटलाल ओस्तवाल व राजकुमार चोरडीया यानी सुमारे १५ एकर जागा गुरु आनंद फाउंडेशनला उपलब्ध करून दिली. येत्या ७ महिन्यात हे सर्व प्रकल्प पूर्ण निर्मीत होउन गुरुभक्तांसाठी सज्ज होणार आहे. अशा या तीर्थाकडे आज जगभराचे डोळे लागले आहेत व डोळ्यांचे पारणे फेडणारे असे हे तीर्थ लवकर समाज समर्पणासाठी सुसज्ज होत आहे. १६ एप्रिल रोजी चिचोंडी गुरु आनंद तीर्थ येथे दरवर्षीप्रमाणे हजारो गुरुभक्तांच्या उपस्थीत १३० वर्षीतप तपस्वींचे पारणे झाले. उपाध्याय प्रवीणत्रषीजी म.सा.च्या श्रीमुखाने तपस्वींची आलोचना व अतिशय दिमाखात शाही व्यवस्थेत तपस्वींचे पारणे झाले, या प्रसंगी उपाध्याय प्रवीणऋणीजी म.सा., उत्तम वक्ता श्री लोकेशत्रपवीजी म.सा., मधुरकंठी श्री तीर्थेशऋषीजी म.सा., साध्वीरमा श्री प्रीतीदर्शनाजी म.सा., श्री प्रशमदर्शनाजी म.सा. आदी ठाणा ५ चे मंगल सान्निध्य दरवर्षीप्रमाणे पारणोत्सवाआधी तपस्वीची शोभायात्रा स्थानकापासून आनंदतीर्थपर्यंत काढण्यात आली.

शोभायात्रेची सांगता लेझीम,गरबा अशा अनेक सांस्कृतीक प्रस्तुतीने झाली. ११ ते १७ एप्रिल दरम्यान २४ वे तीर्थकर भगवान महावीरांचे अंतिम वरदान, अंतिम वचन असलेला ग्रंथ श्रीमद् उत्तराध्ययन सुत्राचे सविवेचन पारायण जिनेश्वरी पारायण सप्ताह या स्वरूपात करण्यात आले. ज्यांच्या रोम रोमात प्रभू महावीर वसलेले आहेत अशा उपाध्यायश्रीच्या श्रीमुखातून निरंतर सात दिवस सकाळी ७ ते १० व दूपारी २ ते ५ अश वेळेत अमृतवाणीचा लाभ ६०० पेक्षा जास्त बंधु-भगिनी घेत होते. सात दिवस प्रत्येकजण मंत्रमुग्ध होउन ऐकत राहीले, प्रत्येक अध्यायाचे साररूप भजन श्री तीर्थेशऋषीजी मसा व महासती श्री ओजसदर्शनाजी म.सा.च्या मधुरवाणीतून भजन रुपाने गायले जायचे. संध्या समयी प्रतिक्रमणानंतर भजन संध्याने कार्यक्रमाची मधुरता वाढविली. या पारायणात दिवंगत महासती डॉ. ज्ञानप्रभाजी महाराजांच्या शीष्यसमूहाने उपस्थीत राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली अशा या अभूतपूर्व, प्रथमच झालेल्या जिनेश्वरी पारायण सप्ताहात आलेला प्रत्येकजण आमृतपानाने ओतप्रोत झाला. या पारायण सप्ताहाचे नियोजन आकुर्डी येथील रोहन मुनोत व त्यांच्या टीम द्वारे अतिशय कुशलतेने करण्यात आले त्यामुळे आजच्या या तीव्र उष्णतेच्या दिवसात अमृतपानाचा थंडावा संर्वांना घेता आला. या सर्व कार्यक्रमात गुरु आनंद फाउंडेशनचे सर्व विश्वस्त, आनंदतीर्थ लोकल कमीटीचे सदस्य, पंचक्रोशी गुरुभक्तांचे सेवा-परीश्रम लागले.