आम्ही दूत लोकशाहीचे उत्कृष्ट व्हिडिओ मालिका :आशिष येरेकर

0
46

नगर – ’लोकशाहीमध्ये अधिकार, कर्तव्य, हक्क, भावना या घटकांना महत्त्वाचे स्थान आहे. एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कोट्यावधी जनमाणसावर असतो. तो प्रभाव जनमत घडवत असतो. अशा व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून मतदार जनजागृती होणे ही सुसंधी असते. अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचा आम्ही दूत लोकशाहीचे अशा लोकप्रिय व्यक्तींचे व्हिडिओ संकलनाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुका २०२४ मध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी देशातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या मतदार जनजागृती विषयक व्हिडिओ संकलित करून ’आम्ही दूत लोकशाहीचे’ हा उपक्रम सध्या सोशल मीडियावर गौरवला जात आहे. या उपक्रमाच्या विमोचन प्रसंगी श्री. येरेकर बोलत होते. भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड, राजीव कुमार-मुख्य निवडणूक आयुक्त, एस सोमनाथ चेअरमन इस्रो, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेते अमिताभ बच्चन, आमिर खान, आयुष्मान खुराना, राजकुमार राव, आर माधवन, तापसी पन्नू, संगीतकार ए आर रहमान, गायक उदित नारायण, खेळाडू स्मृती मानधना, नीरज चोप्रा, पुष्पेंद्र सिंह, मोहम्मद शेख, शुभमन गिल यांसह मराठी, हिंदी सिनेसृष्टी – मालिका व भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी – महाराष्ट्र यांच्या वतीने उपलब्ध झालेल्या संगीतकार गायक, अभिनेते, अभिनेत्री, सामाजिक व्यक्तिमत्व, खेळाडू तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र श्री. चोक्कलिंगम, किरण कुमार कुलकर्णी, जिल्हाधिकारी सालीमठ, बाळासाहेब कोळेकर (अतिरिक्त जिल्हाधिकारी), अशोक कडूस स्वीप नोडल अधिकारी व स्वीप समितीच्या विविध स्पर्धांमधून संकलित झालेले उत्कृष्ट व्हिडिओ या मालिकेमध्ये समाविष्ट आहेत. डॉ. अमोल बागुल (जिल्हा मतदारदूत) यांनी हे व्हिडिओ संकलित केले आहेत. प्रस्तुत सर्व व्हिडिओ स्वीप समितीच्या स्वीप टीव्ही या youtube चॅनलवर तसेच नगर स्वीप फोरम या फेसबुक पेजवर दर्शकांना पाहता येतील. ज्यांना या विविध व्हिडिओची लिंक हवी असेल त्यांनी देशातील पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक असलेल्या ९००२ १० ९००३ या क्रमांकावर स्वतःचे संपूर्ण नाव पाठवावे. उपक्रमासाठी राहुल पाटील (उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी), मीना शिवगुंडे (स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी), आकाश दरेकर (स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी), प्रदीप पाटील (तहसीलदार निवडणूक), प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार) व सर्व स्वीप समिती सदस्य आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.