राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते संदीप शिंदे यांचा ‘हिल मेमोरियल पुरस्कार’ देवून गौरव

0
62

 

नगर – नगरचे संदीप शिंदे यांना नुकतेच राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हिल मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फॉरेस्ट्री विषयांमध्ये सर्वोत्तम कामगिरीबद्दल शिंदे यांचा दीक्षांत समारंभात सन्मान करण्यात आला. संदीप शिंदे यूपीएससी परीक्षेद्वारे २०२१ साली भारतीय वन सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी देशात ३२ वा क्रमांक मिळवला. ते प्रशिक्षणासाठी मसुरी येथे फाऊंडेशन कोर्ससाठी सहा महिने होते व नंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अ‍ॅकॅडमी, डेहराडून येथे पुढील प्रशिक्षण झाले. नुकतेच झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. संदीप यांना झारखंड कॅडर भेटले असून लवकरच ते सेवेत दाखल होणार आहे. ते झारखंड मधील बोकारो या शहरात संलग्न पदाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. शासकीय तंत्रनिकेतनचे सेवानिवृत्त प्राध्यापक कारभारी शिंदे यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव आहेत. त्यांचे शालेय शिक्षण अशोकभाऊ फिरोदिया शाळेत झाले असून, त्यांनी एमई (मेकेनिकल) पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. दिल्ली येथे यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी राहिले. त्यांच्या यशात वडील प्रा. कारभारी शिंदे व आई मंदाकिनी शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन मि ळाले. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून, अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.