लोकसभा निवडणुकीत दिव्यांग विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

0
17

नगर – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ बुरुडगाव रोड भोसले आखाडा अहमदनगर येथे विशेष समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे यांनी सदर केंद्रास भेट दिली. त्यावेळी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे त्यांच्या समवेत दिव्यांग विद्यार्थी विनायक केशव ढाकणे, मनीषा केशव ढाकणे, स्नेहल कांतीलाल पुरोहित, शादाब समीर शेख या कर्णबधिर, अस्थिव्यंग व मतिमंद या दिव्यांग व्यक्तींनी मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी जाऊन बजावला. या वेळी दिव्यांग विद्यार्थी मतदारांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदर मतदान केंद्रावर दिव्यांग नोडल अधिकारी झावरे बाबासाहेब व सहाय्यक नोडल अधिकारी सुशीला जाधव व उमा शंकराव अवचट या ठिकाणी उपस्थित होते