सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

0
12

नवीदिल्ली – सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा सीबीएसई बोर्डातील बारावीचे ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा सीबीएसई बोर्डातील बारावीचे ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट ललीश.र्सेीं.ळप वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल २० मे रोजी जाहीर करण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच सोमवारी अचानक बोर्डाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा सीबीएसई बोर्डातील सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यातील ८७.९८ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत ०.६५ टक्के अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे. यंदा मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ६.४० टक्क्यांनी चांगला लागला आहे. यावर्षी ९१.५२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ८५.१२ टक्के मुलं पास झाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ललीश.र्सेीं.ळप, ललीश.पळल.ळप, ीर्शीीश्रीीं.ललीश.पळल.ळप आणि ललीशीर्शीीश्रीीं. पळल.ळप या वेबसाईटवर पाहता येणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या निकालात केरळच्या त्रिवेंद्रम शहराने बाजी मारली आहे. त्रिवेंद्रम या शहराचा निकाल ९९.९१ टक्के लागला आहे. दिल्ली पश्चिम या ठिकाणाहून ९५.६४ टक्के आणि दिल्ली पूर्व ९४.५१ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. तसेच नोएडा क्षेत्रातील ८०.२७ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. या क्षेत्रातून १ लाख २२ हजार १७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल यादरम्यान झाली होती. तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १३ मार्च यादरम्यान पार पडली होती. यामुळे दहावी-बारावी या दोन्हीही इयत्तेतील ३९ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यंदा सीबीएसई बोर्डातून १७ लाख ०४१ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. ही परीक्षा ७१२६ सेंटरवर आयोजित करण्यात आली होती. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही सीबीएसई बोर्डाने टॉपर्सची नावं जाहीर केलेले नाहीत.