आनंदधाम येथे अक्षय्य तृतीयेनिमित्त वर्षी तप पारणा महोत्सव उत्साहात

0
10

नगर – आनंदधाम येथे अक्षय्य तृतीयेनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. महाराष्ट्र प्रवर्तक श्री कुंदनऋषिजी म.सा., प्रबुद्ध विचारक श्री आदर्शऋषिजी म. सा., जिन शासन प्रभावक श्री सौरभमुनिजी म. सा., आलोकऋषीजी म.सा., गौरवमुनीजी म.सा. आदि संतवृंद व सेवाभावी श्री सत्यप्रभाजी म., श्री त्रिशलाकंवरजी म., श्री पुष्पकवरजी म., महाराष्ट्र प्रवर्तिनी श्री प्रतिभाकवरजी म., उपप्रवर्तनी श्री मंगलप्रभाजी म., श्री दिव्य दर्शनजी, श्री विश्वदर्शनजी म., श्री विचक्षणजी म, श्री पुष्पचूलाजी म, श्री आराधनाजी म, श्री मंगलप्रभाजी आदि ठाणा यांच्या सान्निध्यात वर्षीतप पारणा महोत्सव, महाराष्ट्र प्रवर्तिनी प्रतिभाकंवरजी म.सा.यांचा प्रवर्तिनी पदांलकरण चादर समारोह, महासतीजी उज्वलकंवरजी यांची दीक्षा जयंती, श्रमण संघ स्थापना दिन महोत्सव साजरा करण्यात आला. साधूसाध्वीजींनी आपल्या प्रवचनात अक्षय्य तृतीयेचे महत्व विशद करून तपस्वींचे कौतुक केले. श्रमण संघ दिन हा सर्वांना एका धाग्यात बांधणारा तसेच संघटनेतून सद्विचारांचे आदानप्रदान करणारा दिवस आहे.

वर्षी तपाला जैन धर्मात अतिशय महत्व आहे. प्रथम तीर्थंकर आदिनाथ ऋषभदेव भगवान हे आपले राज्य मुलांमध्ये वाटून टाकल्यानंतर तपस्वी बनले. जवळपास एक वर्षभर त्यांनी उपवास केले. ते हस्तीनापुरात गेले तेव्हा त्यांना ऊसाचा रस प्यायला मिळाला. तो दिवस अक्षय्य तृतीयेचा होता. तेव्हापासून जैन धर्मात याकाळात वर्षी तप पारणा करताना उसाचा रस घेतात. यावर्षी नगरमध्ये तब्बल ६० जणांनी वर्षी तप केले. त्यांचा जैन श्रावक संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष हस्तीमल मुनोत, सेक्रेटरी संतोष बोथरा, संतोष गांधी, उपाध्यक्ष आनंदराम मुनोत, सतीश लोढा, आनंद चोपडा, अनिल दुगड, राजेंद्र गांधी, अभय लुणिया, नितीन शिंगी आदींसह श्रावक श्राविका उपस्थित होते. अक्षय्य तृतीयेनिमित्त गौतम प्रसादीची व्यवस्था करण्यात आली होती.