नगर शहर परिसरात चेन स्नॅचिंग करणारे ३ सराईत गुन्हेगार पकडले

0
58

चोरीतील १ लाख ८९ हजारांचे दागिने हस्तगत पोलिसांनी केले हस्तगत

नगर – नगर शहर परिसरात चेन स्नॅचिंग करणार्‍या ३ सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले असून त्यांच्याकडून १ लाख ८९ हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. बिरज्या उर्फ बिरजु राजु जाधव (वय २३, रा. मकासरे चाळ, कायनेटीक चौक, अहमदनगर), कृष्णा उर्फ बुट्या मुकेश रनशुर (वय १९), कुंदन सुंदर उर्फ लक्ष्मण कांबळे (वय २५, दोघे रा. समाजमंदीराजवळ, वाकोडी, ता. नगर) अशी त्यांची नावे आहेत. नगर शहर परिसरात गेल्या काही दिवसांत चेन स्नॅचिंग घटना वाढल्या होत्या. अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांना पकडण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना दिल्या होत्या. त्यानुसार पो.नि. आहेर यांनी स्थानिक गुन्हे नगर शहर परिसरात चेन स्नॅचिंग करणार्‍या ३ सराईत गुन्हेगारांना पकडल्यानंतर त्यांच्या समवेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक. शाखेतील स.पो.नि.हेमंत थोरात, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, संदीप पवार, रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, संतोष खैरे, फुरकान शेख, मयुर गायकवाड, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आढाव, संभाजी कोतकर यांचे पथक तयार करुन त्यांना चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपासकामी पाठविले. या पथकाने दि.२ मे रोजी सायंकाळी गुलमोहोर रोड वरील नवले नगर येथील सौ. कांता सुभाष पुरी यांची सोन्याची चेन पळविणार्‍या दोघा अज्ञात चोरट्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली. घटना ठिकाणी भेट देवुन परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज संकलित केले होते. सदर फुटेजमधील संशयीत आरोपींची माहिती काढत असतांना फुटेजमधील एक इसमाची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.

सदर आरोपीची माहिती काढत असतांना पथकास सदर आरोपी हा त्याचे साथीदारासह वाकोडी फाटा ते वाकोडी जाणारे रोडवर असलेल्या नाल्याजवळ थांबले असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पथकाने त्या ठिकाणी जावुन खात्री करता तेथे ३ संशयीत इसम मिळुन आले. त्यांना त्यांची नावे विचारल्यावर त्यांनी बिरज्या उर्फ बिरजु राजु जाधव (वय २३, रा. मकासरे चाळ, कायनेटीक चौक, अहमदनगर), कृष्णा उर्फ बुट्या मुकेश रनशुर (वय १९), कुंदन सुंदर उर्फ लक्ष्मण कांबळे (वय २५, दोघे रा. समाजमंदीराजवळ, वाकोडी, ता. नगर) अशी नावे सांगितली. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या कडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी शहरात २ चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेले १ लाख ८९ हजारांचे २७ ग्रॅम सोन्याचे दागिने नातेवाईकांकडे ठेवले असल्याचे सांगितले. या पथकाने नातेवाईकांकडे जावून ते दागिने हस्तगत केले. यातील आरोपी बिरजा राजु जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द नगर जिल्ह्यामध्ये दरोडा, तयारी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे, दुखापत करणे असे एकुण ११ गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी कुंदन सुंदर उर्फ लक्ष्मण कांबळे याचेविरुध्द यापुर्वी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.