उष्माघाताने नगरमधील ११ वर्षीय बालकाचा मृत्य

0
49

राहुरी – राहुरी तालुयातील तांभेरे येथील ११ वर्षाच्या साई गोरक्षनाथ मुसमाडे या चिमुकल्याचा उष्मघाताने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.५) घडली आहे. वाढत्या उन्हामुळे चिमुकला साई याचा बळी गेल्याने नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे. तांभेरे येथील गोरक्षनाथ मुसमाडे यांचा एकुलता मुलगा साई हा इयत्ता ५ वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. उन्हाचा तडाखा बसल्याने साई याला उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उन्हाचा तडाखा बसल्याने उष्माघाताने साई याला त्रास होऊन मृत्यूचा सामना करावा लागला आहे. साई याच्यावर रविवारी तांभेरे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत साईच्या पश्चात आई व वडील असा परिवार आहे.