निंबळक रेल्वे गेट मधील रुळ बदलण्याचे काम सुरु

0
73

निंबळक – नगर तालुयातील नगर- मनमाड रेल्वेमार्गावरील निंबळक येथील रेल्वे गेट क्रमांक ३० हे ६ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून ते ८ सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुळ बदलण्याच्या कामासाठी बंद असून या ठिकाणी दोन दिवसांपासून हे काम अतिशय वेगात केले जात आहे. यापुर्वीही १० ते १५ जानेवारी दरम्यान सहा दिवस येथे दुहेरी मार्ग करण्याच्या कामानिमित्त सदरचे गेट बंद होते. या कामामुळे निंबळक, इसळक, खारेकर्जूने येथील जाणार्‍या- येणार्‍या प्रवाशांना, कामगारांना नागरिकांना, दुग्धव्यवसायीकांना रेल्वे मार्गाच्या कडेने पत्री पुलाच्या खालून जाऊन नगर बायपासचा वापर करून एमआयडीसीत तसेच नगर- मनमाड हायवेकडे मार्गक्रमण करावे लागत आहे. हा मार्ग अतिशय खराब आहे परंतू नाईलाजास्तव या मार्गाने लोकांना आपला जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार होणार्‍या या कामांमुळे येथे कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी उड्डाणपूल करण्याची मागणी निंबळक, इसळक, खारेकर्जुने मधील नागरिकांची आहे.