अनिल शेकटकर यांच्या उमेदवारीला शिवराष्ट्र सेना पक्षाचा जाहीर पाठिंबा

0
18

राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे यांची माहिती; धनशक्ती विरोधात ‘रोड रोलर’ ची नगर शहरातून प्रचारफेरी

नगर – नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार अनिल शेकटकर यांना शिव राष्ट्र सेना पक्षाने पाठिंबा दिला असून, त्यांच्या प्रचार रॅलीत पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. याप्रसंगी शिव राष्ट्र सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे, शहर जिल्हाध्यक्ष सतीश खैरे, ओबीसी आघाडी प्रमुख बाबासाहेब करपे, शहराध्यक्ष मनिष औशिकर, भिंगार अध्यक्ष राकेश सारवान, उपाध्यक्ष कुणाल बैद, संघटन मंत्री नवनाथ मोरे, महिला आघाडी प्रमुख सुनिता चव्हाण, प्रतिबिंब सामाजिक संस्था अध्यक्ष दादू नेटके, सकल एक संघ मातंग समाजाचे विजय पाचारणे, जालिंदर शेलार, सकल मातंग समाजाचे अध्यक्ष भगवानराव जगताप, राजेंद्र साळवे, अनिल जगताप आदि उपस्थित होते. यावेळी उमेदवार अनिल शेकटकर यांनी सांगितले की, मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने सामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांचे प्रश्न समजून घेऊन मी २४ तास जनसामान्यांची सेवा करत आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मातब्बर उमेदवार असून धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी लढाई आहे. या विरोधात गरिबांची एकजूट या मुद्यावर मी निवडणूक लढवत आहे, तरी ‘रोड रोलर’ या चिन्हाचे बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्यावे व सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन केले. यावेळी भगवानराव जगताप म्हणाले, अनिल शेकटकर हे सर्वसामान्य कुटूंबातील आहेत. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. शिव राष्ट्र सेना पक्षाच्या माध्यमातून जनहिताच्या प्रश्नांसाठी आंदोलने उभे करुन, प्रश्न मार्गी लावली आहेत.

आता लोकसभेचे उमेदवार म्हणून ते सक्षम असून, जनतेने त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊन सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे म्हणाले, सत्ताधारी व विरोधक गेली वीसय्पंचवीस वर्षापासून एकमेकांच्या विरोधात असणारे व दंड थोपटणारे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व इंदिरा काँग्रेस सध्याला एकत्र येऊन राज्यात सत्तेचा मलिदा खात आहेत. आणि सर्वसामान्य महिला जेष्ठ नागरिक, पुरुष, शेतकरी, कामगार व तसेच पीडित समाज यांच्या प्रश्नांकडे कुणाचेही लक्ष नसून फक्त आणि फक्त सर्व पुढारी राज्यकर्तेे हे या पिढीत समाजाचं रक्त शोषण करून धनवान होत चाललेले आहेत. केंद्रशासित व राज्यशासित प्रश्न ऐरणीवर तसेच पडून असुन आज संपूर्ण राज्याचा गोंधळ उडालेला दिसत आहे. फक्त ईडीची चौकशीही सत्तेचा उपयोग करून घेण्याकरता व त्यावर पोलीस यंत्रणा राबवून सर्वसामान्यांवर दहशत करण्याचा प्रयत्न सध्याच्या सरकारचा चालू आहे. या विरोधात शिवराष्ट्र सेना पक्ष अनिल शेकटकर यांना पाठिंबा देऊन या यंत्रणेविरोधात गरिबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. ही फेरी माळीवाडा, टिळक रोड, सक्कर चौक, स्टेशन रोड, मल्हार चौक, स्टेशन, केडगाव, भुषणनगर मार्गे निघून जगताप मळा येथे समारोप करण्यात आला. शेवटी आभार मनीष औशिकर यांनी मानले.