पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (७ मे) दुपारी एक वाजता लोकसभा निवडणुकीच्या अहमदनगर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सावेडी उपनगरातील संत निरंकारी भवनशेजारील मैदानावर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी येथे सुरू आहे. या निमित्ताने अहमदनगर महापालिकेने या परिसरातील प्रेमदान हडको, टिव्ही सेंटर, गुलमोहर रोड, कुष्ठधामरोड या भागातील खड्डे बुजवण्याचे तसेच स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले आहे या निमित्ताने या भागातील खड्डे समस्या तात्पुरती दूर होणार आहे.