पश्चिम बंगालमधून अल्पवयीन मुलीला पळवून आणणारा आरोपी नगरमध्ये पकडला

0
90

नगर – पश्चिम बंगाल राज्यातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून आणणारा आरोपी एमआयडीसी पोलिसांनी नगरमध्ये पकडला आहे. प्रशांत उर्फ अभिजीत सजोल घोष (वय २४, रा. पश्चिम बंगाल) असे त्याचे नाव असून त्याच्यासह पिडीत अल्पवयीन मुलीला पश्चिम बंगाल मधील बारबोणी पोलीस स्टेशनच्या पोलिस अंमलदारांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती एमआयडीसीचे स.पो.नि. माणिक चौधरी यांनी दिली. आरोपी घोष याने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा बारबोणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला होता. सदर आरोपी हा नगरमधील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असल्याची माहिती बारबोणी पोलिसांना मिळताच त्यांनी स.पो.नि. माणिक चौधरी यांच्याशी संपर्क साधून आरोपी व पिडीत मुलीचे वर्णन कळविले. एमआयडीसी पोलिसांचे पथक या दोघांचा शोध घेत असताना शुक्रवारी (दि.३) त्यांना हे दोघे नागापूर परिसराम ध्ये मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन सदर पीडित अपहरित मुलगी व आरोपी यास बारबोणी पोलीस स्टेशनच्या पोलिस अंमलदारांच्या ताब्यात देण्यात आले आहे.