कार्यालयातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी

0
16

नगर – मंगल कार्यालयात विवाह सोहळ्याची गडबड सुरु असताना अज्ञात चोरट्याने ’हातसफाई’ करत महिलेचे ३ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना नगर तालुयातील निमगाव वाघा येथील प्रियदर्शनी मंगलकार्यालयात घडली. याबाबत सुनंदा रावसाहेब टकले (वय ६०, रा. भोयरे पठार, ता.नगर) यांनी शुक्रवारी (दि.३) दुपारी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी टकले या बुधवारी (दि.१) दुपारी एका विवाह सोहळ्यासाठी नगर तालुयातील निमगाव वाघा येथील प्रियदर्शनी मंगलकार्यालयात गेल्या होत्या. त्या विवाह सोहळ्याच्या गडबडीत असताना दुपारी ३ ते ५ या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या कडील ३ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र त्यांची नजर चुकवून चोरून नेले. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.