भरदुपारी बाजार पेठेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

0
85

नगर – शहरातील बाजार पेठ परिसरात असलेल्या तेलीखुंट येथून भर दुपारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना गुरुवारी (दि.२) दुपारी १२.३० ते २ वाजेच्या दरम्यान घडली आहे. याबाबत त्या पिडीत मुलीच्या आईने रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीची अल्पवयीन मुलगी ही गुरुवारी दुपारी घरी असताना अज्ञात व्यक्तीने तिला कशाची तरी फुस लावून पळवून नेले. दुपारी फिर्यादी यांना त्यांची मुलगी घरात दिसून न आल्याने त्यांनी तिचा आजूबाजूला तसेच नातेवाईकांकडे, तिच्या मैत्रिणींकडे शोध घेतला. सायंकाळ पर्यंत शोध घेवूनही ती सापडली नाही, त्यामुळे अखेर रात्री त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध भा.दं. वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.