सोन्या चांदीच्या दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण

0
26

नवी दिल्ली – मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने आणि चांदीच्या किंमती आता खाली घसरत आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र पाहायला मिळाले असून गेल्या दोन महिन्यातील दरवाढीचे खरेदी करणार्‍यांना घाम फोडला. दोन्ही धातूंनी आतापर्यंतचे भाववाढीचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले असून सोने-चांदीची घौडदौड सुरु असताना गेल्या आठवड्यात तुफान दरवाढील ब्रेक लागला तर नव्या आठवड्याची सुरुवातही घसरणीच्या झाली आहे. येत्या काळात दर आणखी कमी होण्याची शयता तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याचे भाव कमी होत असून चांदीची किंमतही स्वस्त होत आहे. सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी सोन्याच्या भावात ३०० रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. मल्टी कमोडिटी एसचेंज वर सोमवारी जून सोन्याचा वायदा २२९ रुपयांनी कमी होऊन ७१,२७१ रुपये प्रति १० ग्रॅमवर दिसून आला असून सकाळपासूनच सोन्याचा भाव घसरत आहे. तसेच ऑगस्ट सोन्याचा वायदाही १९४ रुपयांनी स्वस्त होऊन ७१,३३० रुपये प्रति १० ग्रॅमवर घसरला आहे. दुसरीकडे, सोन्याप्रमाणेच चांदीचे फ्युचर्सही स्वस्त झाले आहेत. चांदीचा मे वायदा प्रतिकिलो ८०,६६८ रुपयानावर व्यापार करत असताना जुलै चांदीचे फ्युचर्स ८२,४७२ रुपये तर चांदीचा सप्टेंबर वायदा ८३,८१९ रुपये प्रति किलो झाला आहे.