हातात तलवार घेवून गांधी मैदान परिसरात दहशत

0
52

नगर – शहरातील चित्रा टॉकिज ते गांधी मैदान रस्त्यावर हातात धारदार तलवार घेवून आरडाओरडा, शिवीगाळ करत दहशत करणार्‍या युवकाला कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. त्याच्या कडून तलवार जप्त करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गणेश रामदास बुलाखे (वय २२, रा. दिनेश हॉटेल पाठीमागे, कल्याण रोड) असे या युवकाचे नाव आहे. गणेश बुलाखे हा रविवारी (दि.२८) रात्री ८.२० च्या सुमारास चित्रा टॉकिज ते गांधी मैदान रस्त्यावर हातात धारदार तलवार घेवून आरडाओरडा, शिवीगाळ करत तसेच आवेशपूर्ण हावभाव करत फिरत होता.

युवकाला पोलिसांनी पकडले; तलवार जप्त करत गुन्हा केला दाखल

त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. कोणीतरी कोतवाली पोलिसांना याबाबत माहिती दिली. ही माहिती मिळताच कोतवाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी शिताफीने गणेश बुलाखे याला झडप घालून पकडले. त्याच्या हातातून तलवार काढून घेत त्यास पोलिस ठाण्यात नेवून अटक केली. त्याच्या विरुद्ध शस्र अधिनियम कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.