हातात कोयते घेवून मोटारसायकलवरुन युवकांचा रात्रीच्यावेळी केडगावमध्ये वावर; पोलिसांनी पकडले

0
45

नगर – रात्रीच्या वेळी हातात धारदार कोयते घेवून काही तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने मोटारसायकलवर चाललेल्या दोघांना कोतवाली पोलिसांच्या पथकाने केडगाव परिसरात पकडले आहे. किरण रविंद्र सोनवणे (वय २०, रा. लामखडे पेट्रोल पंपामागे एमआयडीसी) व महेश पाटीलबा खेमनर (वय ३५, रा. शाहूनगर, केडगाव) असे या दोघांची नावे आहेत. केडगाव परिसरात गुरुवारी (दि.२५) रात्री १० च्या सुमारास दोघे जण हातात धारदार कोयते घेवून काही तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने मोटारसायकलवर फिरत आहेत, अशी माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ केडगाव येथे धाव घेत या दोघांना पकडले. त्यांच्याकडून २ कोयते व १ टीव्हीएस व्हिटर मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध पोलिस अंमलदार प्रमोद लहारे यांच्या फिर्यादीवरून शस्र अधिनियम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.